केस गळत असल्यास उपाय

१. कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

२. कांदा हा केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इंफेक्शन नष्ट करतो. आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनण्यास मदत करतो.

३. कसा उपयोग करणार :

– कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस्त केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवू द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे.

– कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेली चांगली. एक चतुर्थ कप रसात थोडीशी मध मिसळायची. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल.

– एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे थांबतील.

– एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल.

– आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात.

४. केस गळण्यासाठी हे टाळा :

– तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचे टाळा. तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान करण्याचे टाळा. त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल. जास्तीत जास्त पाणी प्या.

– मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करावीत. ती थंड करून दररोज केसांना लावावीत. त्यामुळे केस गळण्याचे थांबतील.

– मेथीचे बी पाण्यात रात्री भिजत टाका. सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तास तरी केसांना लावून त्यानंतर केस धुवा. हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तसेच नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल.

– नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले. केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे. त्यामुळे केस गळायचे थांबतात.

५. काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते, काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा

६. कांद्याचा रस : कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

कसे कराल ?

– एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा

– रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा

– सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या

– आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा

७. लसुण : कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते.

कसे कराल ?

– लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या

– त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या

– मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा

– ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका

– असे आठवड्यातून दोनदा करा.

८. नारळ : केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कसे कराल ?

– नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा

– तासाभराने केस धुऊन टाका

– किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा

– रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

९. हीना : केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘ हीना ‘ प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

कसे कराल ?

– २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.

– हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.

– आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा

– सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका

१०. केसगळतीवर गुणकारी हीना :

– हीनामुळे केस घनदाट, मऊ व सुंदर बनतात व केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.

– हीनाच्या वापरामुळे टाळू व केसांच्या देखभालीस मदत होते. त्याच्या आवरणामुळे केस तुटण्यापासून बचावतात.

– हीनामुळे केस दाट व घट्ट होतात.

११. हीना हेअर पॅक्स :

1) हीना व राईचं तेल : २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला. हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा . असे रोज केल्यावर केसगळतीची समस्या आटोक्यात येण्यास मदत होइल.

2) हीना व दही : हीना केसांची मूळ घट्ट करतात तर दही केसांना पोषण देतात.एक कप सुकी हिना पावडर अर्धा कप दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊन टाका.

3) हीना व आवळा , मेथी दाणे : या हेअर * मुळे केसांनी गमावलेले प्रोटीन परत मिळवण्यास मदत होते. टाळूवर आवळ्याच्या वापारामुळे केसांची मूळ घट्ट होतात. मेथीतील प्रोटीन, व्हिटामिन सी व लोह केसांची वाढ वाढवतात. यासाठी एक कप आवळा, तीन टेबलस्पून हीना पावडर , दोन टेबलस्पून मेथी दाणे , एका अंड्यातील पांढरा भाग व लिंबाचा अर्क एकत्र करा. हे मिश्रण लावण्यापूर्वी तासभर आधी बनवून ठेवा . हा हेअर पॅक लावल्यानंतर ४५ मिनिटांनी काढून टाका.

१२. जास्वंद : जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

कसे कराल ?

– काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.

– हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा

– थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

१३. आवळा : केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

कसे कराल ?

– आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा

– हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या

– केस कोमट पाण्याने धुऊन टाका

१४. अंड : अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?

– एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.

– १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.

Leave a Comment