मासिक पाळीच्या वेळी जास्त ब्लीडींग होतंय मग हे घरगुती उपाय करा

1) साबूत धणे :- अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडेसे साबूत धणे उकळा. जेव्हा पाणी गार होईल, तेव्हा त्या पाण्याचे सेवन करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

2) चिंच : – यात फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात, जे रक्ताला जमवण्यात मदत करतो आणि जास्त ब्लीडिंग होण्यापासून बचाव करतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की फार जास्त ब्लीडिंग होत आहे, तर एक चिंचेचा तुकडा नक्की खा.

3) सिट्रस फळं : – व्हिटॅमिन सी, जास्त ब्लीडिंग होण्यापासून रोखतो. मासिक पाळीच्या वेळेस जर तुम्ही संत्र्याचा ज्यूस दिवसातून दोन वेळा प्यायले तर नक्कीच फायदा होईल.

4) ब्रॉक्ली : – हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन असतं, जे रक्त जमण्यास मदत करतो. म्हणून जेव्हा जास्त ब्लीडिंग होत असेल तेव्हा आपल्या आहारात हिरव्या भाज्यांना प्राधान्य द्या.

5) मुळा : – मुळा रक्त जमवण्यास मदत करतो. मुळी शिजवताना, यात मुळ्याचे पान देखील टाकावे. या भाजीला पीरियड्सच्या वेळेस जरूर सेवन केले पाहिजे ज्याने ब्लड फ्लो कंट्रोलमध्ये राहील.

6) पपीता : – तसं तर पपीता पीरियड्स होण्यास मदत करतो. पण कच्च्या पपितेचे सेवन पीरियड्सच्या दिवसांमध्ये केल्याने जास्त ब्लड फ्लो होत नाही. या दिवसांमध्ये तुम्ही कच्च्या पपितेचे दोन पीस खाऊ शकता.

7) आवळा : – आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस, भारी ब्लीडिंगला रोखतो. या ज्यूसला दिवसातून दोन वेळा प्या आणि या समस्येपासून सुटकारा मिळवा. ज्यूस प्यायला नंतर थोडेसे मिठाचे सेवन जरूर करा, ज्याने तुमचा गळा खराब होणार नाही.

8) दालचिनी (कलमी) :- दालचिनीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून ते पाणी प्यायला पाहिजे.

9) कारली : – कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने देखील फायदा होतो. ही भाजी हेवी ब्लीडिंगला कंट्रोल करू शकते.

10 एलोवेरा : – एलोवेराचा ज्यूस दिवसातून दोन वेळा प्यायला पाहिजे. याने देखील समस्या दूर होईल.

Leave a Comment