घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय

१. ऋतूमानातील बदल तुम्हाला आजारी करू शकतात. ताप येणे, घसा खवखवणे अशा छोट्या-मोठ्या कुरबुरी पावसासोबतच येतात. मग त्रागा करत राहण्यापेक्षा दिवसातून दोनदा 2-3 दिवस हळदीचे दूध प्यावे.

२. फायदे : हळदीमध्ये जंतूनाशक आणि दाहशामक घटक असतात. त्यामुळे घसा खवखवणे, घास गिळताना चुरचुरणे, दुखणे, सूज येणे या समस्या कमी होतात. शक्य तितके गरम हळदीचे दूध प्यायल्यास दाह कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत होते.

३. कसे कराल ?

– 6-7 मिरीचे दाणे खलबत्यात जाडसर कुटावेत.

– एक ग्लास दूध मंद आचेवर 5-10 मिनिटे उकळावे.

– दूध उकळायला लागल्यावर त्यात अर्धा टिस्पून हळद, कुटलेली मिरपूड आणि 1 टिस्पून साखर मिसळावी.

– मिश्रण उकळल्यावर गॅस बंद करावा.

– हे दूध थोडे कोमट झाल्यावर प्यावे. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना असे मिश्रण प्यायल्यास खवखवीपासून सुटका होते.

Leave a Comment