ऍलर्जी वर घरगुती उपचार-(Home remedies on allergy)

आपला शरीर खूप संवेदनशील असतो. आपल्या शरीरात काही खूप अतिसंवेदनशील अंग असतात. उदा. नाक, कान, डोळे, त्वचा हे अंग आहेत ज्यांच्यात ऍलर्जी लगेच होते. ऍलर्जी चे अनेक प्रकार आहेत आणि हि अनेक कारणांमुळे आपल्या शरीरात होते. याचा मुख्य कारण प्रदूषित हवा. आपला वातावरण खूप जास्त प्रदूषित झाल आहे. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज, नाक, कान, घश्याचे आजार, अस्थमा इत्यादी खूप वाढले आहेत. ऍलर्जी मुळे चर्म रोग पण होतात. यामुळे त्वचा लाल होते, त्वचेवर पुळ्या होतात. जर आपल्याला देखील श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा सारखी सारखी खाज सुटत असेल, पुळ्या उठत असतील, सारख्या सारख्या शिंका येत असतील तर हि काही ऍलर्जी ची लक्षणे आहेत.

आपल्याला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला हवे ऍलर्जी ची काय करणे आहेत? आणि त्याच्यावर कोणते घरगुती उपचार आहेत? ऍलर्जी शरीरात अनेक प्रकारे होते आणि ऍलर्जी होण्याचे खूप कारण आहेत. हवेमधील प्रदूषण, संक्रमण यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होते. धूळ, माती आपल्या नाकात जाण्याने शिंका येतात हि देखील एक ऍलर्जी आहे. तसेच वातावरणात होणारे परिवर्तन याच्यामुळे देखील ऍलर्जी होते. तर कोणाला मधमाशांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते, काही प्राण्यांना स्पर्श केल्याने देखील ऍलर्जी होते उदा. कुत्रा, मांजर. काही औषधांमुळे देखील ऍलर्जी होते. म्हणून ऍलर्जी वर घरगुती व डॉक्टरी उपचार करणे आवश्यक आहे.

ऍलर्जी ची लक्षणे जाणन्या साठी आपल्याला काही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. ऍलर्जी च्या लक्षणामध्ये नाक सुजणे, सर्दी खोकला कमी न होणे, आपल्या डोळ्यात जळजळ होणे, किंवा डोळ्यातून सारखा सारखा पाणी येणे, डोळे लाल होणे हि देखील ऍलर्जी ची कारणे आहेत. जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, सारखा सारखा खोकला येत असेल तर हे दमा किंवा ऍलर्जी ची लक्षणे आहेत. काही लोकांना गर्मी च्या दिवसात, थंडी व पावसाळ्यात देखील त्वचेची ऍलर्जी होते. पुरळ उठणे, खाज येणे हि काही लक्षणे आहेत, नाक बंद होणे, खूप सर्दी होणे, सारखी सारखी शिंक येणे. हि देखील काही लक्षणे आहेत.

काही लोक एवढे संवेदनशील असतात त्यांना खाण्या पिण्याच्या वस्तूंमुळे देखील ऍलर्जी होते. काहीलहान मुले व वृद्धाना धन्यामुळे देखील ऍलर्जी होते. ज्यामुळे ते गव्हापासून बनवलेली चपाती देखील खावू शकत नाही. काही लोकांना दुध, अंडी, मासे या पासून देखील ऍलर्जी होते. याच्यावर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या. काहीना ऍलर्जी हि औषधांमुळे देखील होते, किड्यांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते तर काहीना ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटीक क्रीम लावण्याने देखील ऍलर्जी होते. ऍलर्जी मुळे आपले स्वास्थ खराब होतो. आणि पोट दुखी, उल्टी, अतिसार, गजकर्ण, खाज, नाक बंद होणे, पुरळ उठणे असे आजार उद्भवतात.

जर आपल्याला ऍलर्जी वर उपचार करायचा असेल तर आपण औषधांचा वापर करू शकता पण यामुळे आपली ऍलर्जी पूर्ण पणे जाणार नाही. ऍलर्जी साठी काही आयुर्वेदिक व घरगुती उपचार देखील आहेत. याच्या उपयोगाने आपण ऍलर्जी पूर्ण पणे घालवू शकतो. जर आपल्याला त्वचेत ऍलर्जी होत असेल तर कापूर आणि नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. याच्यासाठी कापूर थोडा घ्या आणि नारळाच्या तेलात मिळवून पेस्ट बनवा आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज सुटत असेल तिथे लावा, आपल्याला आराम मिळेल.

ऍलर्जी झाल्यावर मिठाच्या पाण्याने गरारा करण्याने आपल्या नाकात आणि तोंडात फसणारी धूळीचे कण आणि बल्गम बाहेर निघून जातो. ज्यामुळे आपल्या नाकाच्या ऍलर्जी ची समस्या दूर होते. याचा उपयोग करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चिमटी सोडा चांगल्या प्रकारे मिसळा आणि या पाण्याचे सेवन करा असे केल्याने आपल्या शरीरातील ऍलर्जी जाईल. आणि नाकात होणारी ऍलर्जी कमी करण्यासाठी आल्याचा वापर करू शकता. कारण आल्यामध्ये एन्टीबायोटीक व एन्टी वायरल तत्व असतात जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होत नाही.

एक कप पाण्यात कापलेला आला, दालचिनीच्या सोबत थोडी लवंग मिळवा व ५ ते १० मिनिटांसाठी उकळवत ठेवा. जेंव्हा हा काढा तयार होईल तेंव्हा याच्यात मध मिळवून चहा सारखा घ्या. असे केल्याने आपली नाकाची ऍलर्जी दूर होईल. असे आपण दिवसातून कमीत कमी तीन वेळा करा आपल्याला आराम मिळेल. तसेच आपल्या घरात असलेले आल, काळी मिरी, तुळशीची पाने, लवंग व खडीसाखर मिळवून चहा बनवा आणि हि चहा पिण्याने आपल्याला ऍलर्जी पासून आराम मिळतो. यामुळे फक्त आपली ऍलर्जी ठीक होत नही तर आपल्याला ऊर्जा देखील मिळते यामुळे आपले इतर आजारांपासून देखील बचाव होतो.

एलोवेरा (कोरफड ) पण आपल्या त्वचा रोगांवर गुणकारी आहे. कारण एलोवेरा मध्ये जीवाणूरोधी व एन्टीब्याकटेरियल तत्व असतात. त्वचेवर होणारी खाज ठीक करण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. एलोवेरा ची काही पाने वाटून घ्या आणि हे त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेवरील ऍलर्जी दूर होईल. याचा वापर आपण कमीत कमी दिवसातून दोन वेळा करा यामुळे आपल्याला फायदा होईल.

कडूलिंबा मध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुण असतात याच्यात जीवनु नष्ट करण्याची शक्ती असते. कडूलिंबाची पाने रात्र भर भिजवून ठेवा आणि हि पाने सकाळी वाटून घ्या आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज होत असेल त्या ठिकाणी लावा असे केल्याने आपली ऍलर्जी दूर होईल. हे काही ऍलर्जी वर घरगुती उपचार आहेत याचा वापर आपण करू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment