कावीळवर घरगुती उपचार-(Home Remedies on Jaundice)

कावीळ एक गंभीर आजार आहे. कावीळ हा लिव्हर च्या संबंधित आजार आहे. या आजारात रोग्याचे डोळे व शरीराचा रंग पिवळा पडतो, अजूनकाही बदलाव शरीरात होतात. जसे नखांचा रंग पिवळा होणे, लघवी पिवळी होणे. कावीळ हा साधारण आजार वाटतो पण कावीळवर लवकर उपचार नाही केले तर याचे गंभीर आजारात रुपांतर होते. ज्यामुळे रोग्याच्या जीवाला धोका पोचू शकतो. याच्यावर योग्य उपाय केले नाही तर हा एक खूप धोकादायक आजार ठरतो.

हा आजार शरीरातील रक्तात पित्ताची मात्रा अधिक मात्रेत वाढल्यामुळे होतो. रक्तात पित्तरस बिलरुबिन ची मात्रा वाढल्याने होतो. शरीरात पित्ताचे निर्माण यकृतात होतो. पित्त आपण जे भोजन खातो ते पचवण्याच्या हेतू, तसेच शरीराच्या पोषणासाठी खूप आवश्यक असतो. आपण केलेला भोजन शरीरात कुजण्यापासून रोखण्याचे काम करतो. याच्यामुळेच आपली पचन क्रिया चांगली राहते. जर असे होत नसेल तर कावीळ ने ग्रस्त झालो आहोत समजावे.

कावीळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि कावीळ मुख्यतः तीन प्रकारची असते. पहिली हेमोलाईटीक जॉन्डीस : या मध्ये रक्तातील लालरक्त कणिका नष्ट झाल्यामुळे शरीरात बिलरुबीन वाढतो ज्यामुळे शरीरात रक्ताची कमी होते आणि कावीळ होते. दुसरा प्रकार : शरीरातील बिलरुबीन ड्यूडेनम मध्ये रक्त जाण्यास रोकतो ज्यामुळे कावीळ होते. तिसऱ्या प्रकारात कावीळ लिव्हरच्या सेल्स ला विषाणू संक्रमण ने नुकसान झाल्यामुळे होते.

कावीळीचे अनेक लक्षणे आहेत जसे डोळ्यांच्या रंग पिवळा होणे, अशक्तपण येणे, सतत ताप येणे, उलटी होणे, अंगदुखी, भूक न लागणे, लघवी पिवळी होणे, नखांचा रंग पिवळा होणे, मळमळने, बध्कोष्टता इत्यादी लक्षणे आहेत. कावीळ जास्तकरून वृद्धांना होतो. यामध्ये त्वचेवर जोरदार खाज सुटते.

कावीळीच्या रोग्याने कमीत कमी २ हिरव्या नारळांचा पाणी प्यावा. नारळ फोडल्यानंतर नारळाचे पाणी त्वरित प्यावे. असे केल्याने आपल्या लघवीचा रंग एका दिवसातच बदलेले. असे ४ – ५ दिवस केल्याने आपल्याला फरक जाणवेल.

कावीळीवर उपचार करण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जास्तच वाढला असेल तर आराम करणे आवश्यक आहे. कावीळ झाल्यावर आहारात बदल करणे आवश्यक आहे. तसेच पथ्य पाळावे लागतात. कावीळ झाल्यावर संत्रा, लिंबू, नाशपाती, द्राक्ष, गाजर, बीट, उसाचा रस हे आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

कावीळ झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. शुद्ध पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात. सगळे वासयुक्त पदार्थ जसे तूप, तेल, मक्खन, मलई कमीत कमी २५ दिवसांपार्यत खाऊ नका. तिखट खाण्याचे टाळा, मांस खाण्याचे टाळावे, जैतून च्या तेलाचा उपयोग करू शकता. आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा रस प्या. यामुळे आपल्याला पोषक तत्व मिळतात.

पित्त हा आपण केलेला आहार पचवण्यासाठी जरुरी आहे. पित्त आपण केलेला आहार आतड्यानमध्ये कुजून देत नाही. जर पित्त योग्य तरेने आतड्यात पोचत नसेल तर ग्यास (आंबटपणा ) सारखी समस्या होते आणि शरीरात विषारी तत्व एकत्र होतात.  मुळा च्या पानांचा रस चे सेवन देखील फायदेमंद ठरते. आपल्याला कावीळ झाली असेल तर आपल्या आहारात पर्याप्त मात्रेत प्रोटीन, विटामिन C, विटामिन B कॉम्प्लेक्स असावेत. पूर्णपणे स्वस्थ झाल्यावर देखील आपल्या आहारात निष्काळजी पणा करू नये. कारण योग्य व पोषक आहारामुळे आपण निरोगी राहतो.

आवळा हा कावीळ झाल्यावर खूप फायदेमंद ठरतो. ५० ग्राम आवळ्याचा रस, २ ते ३ मिलीग्राम तुळशीच्या रसा मध्ये मिळवा. आणि याच्या जूस बनवा आणि या जूस चे सेवन सकाळी लवकर करा. २ ते ३ दिवसात आपल्याला फरक जाणवेल. तसेच आपल्या पोटा संबंधी समस्या देखील दूर होतील. जर आपण सकाळी व संध्याकाळी उसाचा रसात लिंबू पिळून पीत असल तर आपल्याला फायदा होईल. कावीळ झाल्यावर दहीचे सेवन करणे फायदेमंद असते कारण कावीळ बरा करणारे चांगले bacteria दही मध्ये असतात.

दही आपल्या शरीराला डिटॉक्सीफाई करतो. टरबूज, केळा, अननस, संत्रा, मोसंबी या फळांचा सेवन जरुर करा आणि आहार नियंत्रित मात्रेत करा. कांदा देखील कावीळ झाल्यावर फायदेमंद आहे. कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिळवून किंवा कांद्यावर लिंबू पिळून सकाळी सलाड प्रमाणे सेवन करा. कावीळ चे लक्षण दूर होतात. धन्याचे १० ग्राम बिया रात्री पाण्यात भिवून ठेवा, सकाळी हा पाणी गाळून प्या या पाण्यामुळे लिव्हर मधील सारे टॉक्सिन्स दूर करेल व आपल्याला आराम मिळेल, त्याचप्रकारे बार्ली चा पाणी पण लिव्हरला डिटॉक्सीफाई करतो आणि कावीळ मध्ये आराम मिळतो. रोग्याला मुळा च्या पानांचा जूस चे सेवन करायला हवा. जर आपल्याला आराम मिळत नसेल तर डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment