डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी कोरफडचे नैसर्गिक उपाय

डोक्यातील कोंडा, डोक्याच्या त्वचेला होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्याच्यामुळे केसांचे नुकसान होऊन केस कमजोर होऊन गळायला लागतात. जर डेंड्रफचा वेळेस उपचार केला नाही तर केस गळण्याची समस्या गंभीर होऊ शकते.

कोंडा होण्याचे कारण, डोक्यात केसाच्या मुळांवर मृत त्वचेचा साठा आहे. ही मृत त्वचा एखाद्या कवचच्या स्वरुपात साठून राहते आणि त्याच्यामुळे डोक्याच्या त्वचेला हानी होते कारण ही डेड स्किन डोक्याच्या त्वचेपासून निघणाऱ्या तेलात मिसळते आणि मग वाळून त्वेचेवरून सूटी होवून खाली पड़ते.

डोक्याच्या कोंड्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात जसं की कोंड्यामुळे खाज सुटणे, शरीराच्या त्वचेवर पुरळ किंवा मुरुम येणे, मानेवर खाज होणे आणि डोळे लाल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

कोरफड (एलोवेरा) जेलचे फायदे, डोक्यातील कोंड्यासाठी उपाय

एलोवेराचे ताजे जेल डंड्रफच्या घरच्या उपायांसाठी एक वरदान आहे (डंड्रफ चा घरगुती इलाज). जर आपणाकडे कोरफड (एलोवेरा) ही वनस्पती घरी असल्यास आपण सहजपणे एलोवेराचे ताजे जेल मिळवू शकता. यासाठी, कोरफडची पानं तोडून चमच्याने त्याचा रस काढावा व हाताने मिक्स करून डोक्याच्या त्वचेवर हा रस मसाज करावा. 30 मिनिटे हा रस केसांवर ठेवून मग केस कोमट पाण्याने स्वरछ धुवावे. असं केल्याने केसांना पोषण तर मिळतेच परंतु केसांतील आर्द्रतेचा अंश देखील नियंत्रणात राहतो.

 डोक्याच्या कोंड्यासाठी नैसर्गिक उपचार – एलोव्हेरासह (एलोवेरा) टी ट्री ऑइल

कोरफड व टी ट्री ऑइल एकत्र करून केसांमध्ये लावण्याने डोक्यातील कोंडा हटवण्यासाठी मदत मिळते. जर आपल्या डोक्यातील कोंड्याचा त्रास संपतच नसेल तर कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे लावण्याने डैंड्रफच्या समस्येवर हमखास इलाज होतो. टी ट्री ऑईलमध्ये ऍन्टिबायोटिक गुणधर्म असतात, जे जीवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे मिश्रण त्वतेचे संक्रमण प्रतिबंध देखील करते. कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे.

कडूलिंबाचे तेल व कोरफड यांचा कोंड्यासाठी आयुर्वेदीक उपाय

आपणाला आधीच माहित असेल की कडुनिंब आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. कडूलिबाच्या तेलामध्ये ऍन्टी-बॅक्टेरियल आणि ऍन्टी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचा संबंधित संसर्ग टाळता येतात. डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी घरच्या उपचारांमधे कडूलिंबाचे तेल फार फायदेशीर आहे. तीन चमचे एलोवेराचे जेल आणि 10 ते 15 थेंब कडूलिंबाचे तेल एकत्र करून यांचे मिश्रण तयार करावे. हे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे. केस साफ करण्यासाठी कुठल्याही सौम्य शॅम्पूचा वापर करावा.

दही, ऑलिव्ह ऑईल व कोरफड यांचा कोंड्यासाठी उपाय

दही डोक्याच्या त्वचेला मॉइश्चराईझ करते.२-४ टीस्पून एलोवेराचे ताजे जेल किंवा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑइल (किंवा नारळ तेल) १ कप दही घेऊन मिक्स करावे. हे मिश्रण केसांचे पॅक म्हणून टाळू आणि केसांवर लावा. ते ३० ते ४० मिनिट सोडून द्या आणि मग केस पाणी आणि शैम्पूसह धुवा. ही प्रक्रिया नियमितपणे करा. यामुळे डैंड्रफ कमी होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment