उंची वाढवण्याचे घरगुती उपचार- (home remedies to increase height naturally)

उंची वाढवण्याचे घरगुती उपचार – उंच दिसणे सर्वांनाच आवडते, एखादी व्यक्ती उंच असेल तर त्याचे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. ज्यामुळे त्यांचा इतर लोकांच्या मध्ये आत्मविश्वास आणि रुतबा वाढतो तसेच पोलीस भरती किंवा सैन्यामध्ये जास्त करून उंच लोकांची निवड केली जाते. तसेच मॉडलिंग सारख्या क्षेत्रात उंच लोकांना प्राधान्य दिले जाते. उंच लोकांच एक आकर्षक व्यक्तिमत्व असते.

उंच लोकांना कोणतेही काम करणे इतरांच्या तुलनेत सोपे जाते. उंची हि एक ठराविक मर्यादित उंची पर्यंतच वाढते, उंची वाढण्यावर देखील एक वयोमर्यादा आहे. साधारणतः उंची हि वयाच्या १८ वर्षा पर्यंतच वाढते. सामान्य पेक्षा कमी उंची असणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच लोकांना वाटते कि उंची हि १८ वर्षा पर्यंतच वाढते पण अस नाही उंची १८ वर्षा नंतर देखील वाढू शकते.

उंची वाढवण्याचे काही सोपे उपाय 

१८ वर्षानंतर हि उंची वाढू शकते, जे लोक उंच असतात ते दिसायला आकर्षकच दिसतात तसेच त्यांच्यात आत्मविश्वास देखील वाढलेला असतो. काही क्षेत्रात तर एका विशिष्ट उंचीची मर्यादा असते. आयुर्वेदात काही अशी औषध आहेत ज्यामुळे आपली उंची वाढायला मदत होते. आणि त्याच बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण मजबूत होतो. या आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्या मुळे  आपण वयाच्या २५ व्या वर्षपर्यंत उंची वाढू शकता. शरीरात HGH हे हार्मोन्स उंची वाढण्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात. HGH म्हणजे human growth Hormone. जर कोणाच्या शरीरात  HGH हे हार्मोन्स कमी असतील तर त्यांची उंची जास्त वाढत नाही. HGH हार्मोन्स हे purgatory gland  मधून निघतात म्हणून आपली उंची वाढते. जर आपल्या शरीराला योग्य ते प्रथिने व पोषक तत्वे मिळत नसतील तर आपल्या शरीराचा विकास होत नाही म्हणजेच हाडांची वाढ होत नाही, आणि यामुळे कितीतरी लोकांची उंची कमी राहते. आणखी एक कारण म्हणजे ज्यांच्या आई वडलांची उंची कमी असेल तर त्यांच्या मुलांची देखील उंची कमी असते, याला अनुवांशिक समस्या म्हणतात हि समस्या अनुवांशिक असेल तर याच्यावर उपचार सोपे नाहीत पण होऊ शकतात.

उंची वाढवण्यासाठी पोष्टिक आहार करणे खूप फायदेमंद आहे.      

आपल्याला जर आपली उंची वाढवायची असेल तर काही घरगुती उपाय करून पहा हे उपचार केल्याने आपली उंची वाढायला मदत होईल. त्याच प्रमाणे आपली त्वचा आणि आपले आरोग्य चांगले राहील, आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष ठेवावे, पोषक आहार करावा. कोल्ड ड्रिंक कमी प्या. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही,. फास्ट फूड व जंक फूड चे कमीत कमी सेवन करा, याच्या सततच्या व जास्त सेवनाने आपली उंची वाढत नाही तर आपण जाडे होतो. आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते. दुध, दही, पनीर, मक्खन, कडधान्य च्या सेवनाने आपली उंची वाढण्यास मदत होते.

काही अशी तत्वे असतात ज्यामध्ये विटामीन्स, मिनरल्स, आणि प्रथिने असतात असे पदार्थ सेवन करा. प्रथिने हि  दुध, अंडी, दही यामध्ये खुप असतात. ताज्या फळांचा आहारात वापर करा त्यामध्ये विटामीन्स व मिनरल्स असतात. त्याच बरोबर फळांचा रस, हिरव्या भाज्या, नियमित पणे खात जा, उंची वाढण्यासाठी आपली चयापचन क्रिया मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी पोषक आहार घेतल्याने आपल्या शरीरात चरबी जमा होणार नाही यामुळे आपली उंची वाढायला मदत होईल. मिनरल्स आणि खनिजे हाडांच्या उतकांचा निर्माण करतात, हे हाडांच्या विकास तसेच शरीरात रक्त प्रवाहात सुधार आणतात, जर आपल्याला आपली उंची वाढवायची असेल तर खनिज युक्त पदार्थांचे सेवन करा उदा. पालक, हिरवी कडधान्य, कोबी, भोपळा, गाजर, डाळ, शेंगदाणे, केळी, द्राक्ष, फ्लॉवर, यांचा आहारात वापर करा.

स्वास्थ वर्धक आणि पोषक आहार केल्याने त्यात उपलब्ध असलेले विटामीन्स, प्रथिने, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तत्व उंची वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून पोष्टिक आहार करा. कार्बोनेट युक्त पेय, तसेच जास्त गोड खाऊ नका. दुध, फळांचा रस, गाजर, सफरचंद, केळी, मासे, चिकन, अंडी, सोयाबीन, कडधान्य आणि हिरव्या भाज्या यांचे जास्त सेवन करा. तसेच बदाम, शेंगदाणे, इतर नट्स हे आपल्यासाठी फायदेमंद ठरतील. विटामीन A हे आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहे, विटामीन A युक्त पदार्थाचे सेवन करा यामुळे आपली हाडे मजबूत होतील व आपली उंची वाढायला मदत होईल उदा. पालक, बीट, गाजर, दुध, टोमॅटो , यांचे सेवन करा तसेच यांचा रस काढून याचे सेवन करा. यामुळे आपल्याला फायदा होईल.

उंची वाढवण्यासाठी योगासन करणे खूप महत्वपूर्ण आहे.

उंची वाढवण्यासाठी योगासन हे सगळ्यात उपयोगी आणि सोपा उपाय आहे आणि योगा मध्ये काही अशी आसन आहेत जी आपली उंची वाढवायला मदत करतात. ताडासन हा योग प्रकार केल्यामुळे आपली उंची वाढायला मदत होईल. छोटे मूल व मुली तसेच किशोरवयातील मूल व मुली यांनी नियमित पणे ताडासनाच अभ्यास केल्यामुळे त्यांची उंची वाढण्यास मदत होईल. ताडासन करण्यासाठी उभे राहून दोन्ही हाथ वरती करून सरळ उभे रहा आणि मोठा श्वास घ्या आणि हळू हळू टाचा आणि हात वर उचलत जा. टाचा पूर्ण उचल्यावर शरीराला ताण द्या आणि परत मोठा श्वास घ्या. ताडासन केल्याने स्नायू सक्रीय होऊन विस्तृत होतात म्हणून ताडासन उंची वाढवण्या साठी फायदेमंद आहे.

त्याच प्रमाणे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्या कडे लक्ष दिल्याने आपल्याला फायदा होईल, बसताना  पोक काढून बसू नका, ताठ बसा, चालताना देखील ताठ चाला, योग्य झोप हि आरोग्यदाई जीवना साठी व आपल्या शरीराच्या विकासासाठी उपयोगी आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम तसेच योगा करा, चालण्याचा व्यायाम करा, योग्य झोप घेतल्याने शरीरात उतकांचा विकास व नवीन उतक निर्माण होतात आणि त्याचबरोबर पर्याप्त झोप घेतल्याने उंचीला नियत्रीत करणारे हार्मोन्सची वाढ होते. हे साधे व सोपे उपाय करून आपण उंची वाढू शकतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

1 thought on “उंची वाढवण्याचे घरगुती उपचार- (home remedies to increase height naturally)”

Leave a Comment