तेलकट चेहऱ्यासाठी उपाय

डागरहित त्वचा दिसण्यामध्ये तेलकट त्वचा हा एक मोठा अडथळा आहे. सहसा सौंदर्या प्रसाधने त्वचेला चमक देण्यापेक्षा ती अधिकच तेलकट करतात. घरगुती उपचार पद्धतीने तुम्ही तेलकट त्वचेपासून बचाव करू शकता. खालील काही आयुर्वेदिक उपाय वाचा..

१. दूध : दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात. चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या गोळ्याने साफ करा हे तुम्ही दिवसातून दोन वेळा तरी करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच करा. अधिक परिणामांकरिता तुम्ही यात लिंबाचे थेंब टाकू शकता.

२. संत्री : ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली संत्री हे त्वचेसाठी उपायकारक आहे. वाटीमध्ये अर्धे संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या गोळ्याने चेहऱ्यावर लावा. हा रस १५ मिनिट करिता ठेवून धुवून काढा.

३. पाणी : कोमट पाण्यात कापसाच्या गोळ्यानेन चेहरा धुवून काढा. बर्फ चेहऱ्यावर चोळा खासकरून नाक आणि कपाळाला चोळा याने छिद्र मोकळे होतील आणि मळ निघून जाईल.

४. चंदन आणि हळद :

– हळदीमध्ये चंदनाची पूड मिसळा आणि यात पाणी किंवा लिंबाचे थेंब घाला. हे मिश्रण चेहऱ्यासोबत चमकदार केसंकारिता देखील उपयुक्त आहे. ही पेस्ट चेहऱ्याला १५ मिनिट लावून धुवून टाका.

– तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुलतानी मातीत दही आणि पुदीन्याच्या पानांची पावडर मिसळून लावावी. गुलाब जल आणि मुलतानी माती मिसळूनही चेहऱ्यावर लावता येईल.

– तेलकट त्वचा असलेल्यांनी चेहरा नियमित स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. त्वचेवर तेल साचून राहिल्यास त्यात धूळ, प्रदुषणाशी संपर्क आल्याने अॅेक्ने / मुरुमं यांची निर्मिती होण्याची शक्यता अधिक असते. या सुचानाचे पालन करून एक निरोगी कोमल आणि तेलकट रहित त्वचा मिळवा.

Leave a Comment