परत परत उचकी येण्याने हैराण? हे उपाय करून पहा(Hiccups treatment)

उचकी आली म्हणजे कोणीतरी आपली आठवण काढतोय असं मानलं जाते परंत वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिल्यास आपल्या शरीरातील डायफ्राम आंकुचन पावल्याने उचकी येते. छातीला पोटापासून वेगळे करणारी मांसपेशी (डायफ्राम) श्वाशोच्छवासात महत्वाची भूमिका बजावते. अशावेळी त्या मांसपेशीचे आंकुचन पावणे म्हणजेच उचकी लागणे होय. या व्यतिरिक्त उचकी येण्याची अनेक कारणं आहेत उदा. तिखट पदार्थ खाणे, दारू पिणे, किंवा घाईघाईने जेवणे. काही वेळेला उचकी आपल्याला खूप त्रास देते अशावेळी काही लहानमोठे उपयांचा उपयोग करून आराम मिळवू शकतो. खालील दिलेले उपाय करून सुद्धा उचकी न थांबल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेयचे आहे.

उचकी थांबविण्याचे उपाय

1) लिंबू उचकी थांबविण्यास मदत करतो. जेव्हा उचकी येईल तेव्हा एक चमचा लिंबूचा रस व एक चमचा मध मिळवून चाटावे त्यामुळे उचकी बंद होईल

2) उचकी थांबवण्याचा एक साधा उपाय म्हणजे दीर्घ श्वास घेऊन काही सेकंद श्वास रोकून ठेवणे त्यामुळे छातीत जमा झालेले कार्बन डायऑक्साईड उच्छश्वासाद्वारे बाहेर पडून उचकी थांबते.

3) आंबटवस्तू खाल्याने देखील उचकी थांबते. जेव्हा उचकी येईल तेव्हा एक चमचा आंबटरस घेतल्याने ताबडतोब आराम मिळतो.

4) उचकी आल्यावर पाण्यात थोडें मीठ घालून एक दोन घोट प्यावे.

5) एक चमचा साखर खाल्यास देखील उचकी थांबते.

6) दोन तीन काळीमिरी खडीसाखरे बरोबर चावून खाल्याने देखील उचकी थांबते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *