थंडीसाठी घरगुती फेसपॅक

1) थंडीत फेसपॅकरूपी मॉईश्चरायझर म्हणून लोणी, कच्चे दूध, साय यात बेसन मिसळून अंगभर चोळावे. हा पॅक आंघोळीपूर्वी लावावा. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडत नाही. वेळ मिळेल तसा एक दिवसाआड हा फेसपॅक लावल्यास सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेपासून तुमची निश्चित सुटका झाली असे समजावे.

2) हिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा. या दिवसांत शक्यतो साबणाचा वापर टाळावा, शक्य झाल्यास ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर केला तर चालेल. त्यामुळे त्वचा मऊ राहते.

3) आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा मॉईश्चरायझर लावावे, पण हे लावल्यानंतर टाल्कम पावडर लावण्याचे टाळावे.

4) हिवाळ्यात सर्वांत जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसांत पायांना भेगा पडतात.

5) भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तळपाय प्युमिक स्टोन किंवा वझरीने रगडून घासावे. पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर लावावे.

6) पाय जास्त कोरडे पडू नये म्हणून हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.

7) थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडणे, त्वचा काळवंडणे, सुरकुत्या पडणे, खाज उठणे असे प्रकार होत असतात. म्हणूनच या दिवसांमध्ये त्वचेची निगा कशी राखावी हे आता आपण पाहूया.

8) तुळशीच्या सुकलेल्या पानांची पावडर, संत्र्याच्या सालीचा रस, ग्लिसरीन (थोडेसे), आंबेहळद (थोडेसे) हे मिश्रण एकत्र करून फेसपॅक तयार करावा. थंडीमध्ये हा फेसपॅक म्हणजे रामबाण उपाय आहे.

9) पूर्ण शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मध, हळद, बेसन सम प्रमाणात घेऊन (पाणी घालू नये) हा स्क्रब आंघोळीपूर्वी शरीराला निदान तीन मिनिटे लावून ठेवावा. हा स्क्रब एक दिवसाआड लावल्यास त्वचा उजळते.

10) त्वचेच्या संरक्षणासाठी खास उटणे: आंबेहळद, कडुनिंबाच्या सुकलेल्या पाल्याची पावडर, नीम पावडर (अगदी थोडी), संत्रा पावडर आणि चंदन एकत्र यांचे उटणे घरात बनवून घ्यावे.

11)थंडीत कोरडी त्वचा खरखरीत होते. या कोरड्या त्वचेसाठीचा हा खास फेसपॅक –
अर्जुन पावडर : १०० ग्रॅम, मंजिष्ठा : १०० ग्रॅम, शंख जिरा १०० ग्रॅम, चंदन पावडर : १०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मायफळ ५० ग्रॅम, जायफळ ४० ग्रॅम, फिटकरी ४० ग्रॅम, खस्ता ५० ग्रॅम, मूग डाळ (थोडीशी), मसूर डाळ (थोडीशी), हे सगळे साहित्य एकत्र करून हा फेसपॅक दूध आणि सायीसह लावावा. हे सर्व साहित्य आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध आहे.

12) पार्लरमध्ये जाताना..
थंडीत त्वचेची निगा राखताना पार्लरला जात असाल तर शक्यतो ब्लिच टाळावे. त्वचा अगदीच काळवंडलेली असेल तर मग कमी अॅतक्टिवेटर वापरून ब्लिच करावे.
फेशिअलमध्ये कोरड्या त्वचेसाठी बदाम, अॅललोव्हेरा, कुकुम्बर, फ्रूट फेशिअलला प्राधान्य द्यावे.
तेलकट त्वचेसाठी या दिवसांमध्ये स्ट्राबेरी फेशिअल हा उत्तम पर्याय आहे.
क्रीम मसाजवर फेसपॅक लावून घ्यावा, जेणेकरून त्वचेतील स्निग्धता कायम राहते.

टीप : थंडीच्या दिवसांत फेसपॅक चेह-यावर सुकवू नये. अधिक वेळ ठेवल्यास चेह-यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. फेसपॅक लावल्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

Leave a Comment