रागावर नियंत्रण कसे करावे (How To Control Anger)

आजकाल लोकांमध्ये short temper (रागीट) चे प्रमाण वाढले आहे. जर आपण देखील रागीट आहात व जर आपल्याला देखील राग लगेच येतो, तर याच्यावर उपाय करणे जरुरी आहे. हे आपल्या सुखी जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. काही लोकांना एवढा राग येतो की त्यांना स्वतः वर नियंत्रण ठेवता येत नाही. ते रागाच्या भरात काहीही करतात, त्यांना इतर गोष्टींचा भान रहात नाही.

अति रागाचे दुष्परिणाम :

क्रोध एक सामान्य आणि जास्त करून स्वाथ्यप्रद मानवाच्या मनातील भावना आहे. रागावर आपण जर लगेच नियंत्रण केलेत तर ते चांगले आहे, जर आपण रागावर नियंत्रण नाही केलेत तर आपल्या समस्या वाढतात. त्या शारीरिक असो, मानसिक असो व भावनिक किंवा सामजिक अति रागामुळे काहीच समजत नाही आणि रागाच्य भरात आपण काहीही करून बसतो. आणि आपले स्वतःचे जास्त नुकसान होते. अतिरागामुळे आपल्या जीवनातही नाही तर आपल्या आरोग्यावर देखील त्याचे वाईट परिणाम होतात. रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके जोराने वाढतात, रक्तदाब मोठ्या प्रमाणत वाढते, तणाव वाढते हे त्याचे प्रारंभिक परिणाम आहेत. श्वास घेण्याची प्रक्रिया जोराने होते, जेव्हा राग येतो तेंव्हा शरीर व मन विचलित होते, वेळेनुसार Metabolism मध्ये बदल होतो. फक्त आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या इतर गुणवत्ते वर देखील प्रभाव पडतो.

रागामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते, जसे हृदयविकाराचा झटका, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्वचे चे आजार , अनिद्रा, पचना संबंधी च्या समस्या, चिंता वाढणे, डोकेदुखी, उच्चरक्तदाब, नकारात्मक भावना निर्माण होते. राग आपली विचार करण्याची शक्ती कमी करतो अशावेळी स्वतःची चुकी असली तरी माणूस ती मानायला तयार नसतो तो नेहमी दुसऱ्याची चुकी शोधत असतो यामुळे अजून राग येतो. रागाचे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहीत असतात म्हणून सगळ्यांनाच रागावर नियंत्रण कसा ठेवावा हे त्यांना जाणून घ्यायचे असते. जेंव्हा राग येतो तेंव्हा प्रथम आपल्या मनावर नियंत्रण ठेवा, जर आपले आपल्या मनावर नियंत्रण असेल तर आपल्याला राग येणार नाही, कारण भास्त्रिका व नाडी शोधन प्राणायम मनातील बेचैनी कमी करण्यास मदत करते. जेंव्हा आपले मन शांत व स्थिर असते तेंव्हा आपली क्रोधीत होण्याची संभावना कमी होते.

जेंव्हा पण आपल्याला खूप राग येईल तेंव्हा मोठा श्वास घ्या व सोडा. जर आपण काही वेळासाठी असे केलेत तर आपला राग कमी होईल. अशावेळी आपले डोळे बंद करा मोठा श्वास घ्या आणि आपल्या मनात काय चालेय त्याकडे लक्ष द्या. आपल्यला माहित असेल श्वास तणाव दूर करते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते, जर आपल्याला रात्री नीट झोप लागत नसेल तर हे देखील राग येण्याचे कारण असू शकते, म्हणून दररोज ८ तास झोपणे जरुरी आहे. यामुळे आपले मन व शरीराला आराम भेटेल आणि आपली बैचैंनी कमी होईल, ज्यामुळे राग येणार नाही. झोपल्या मुळे आपल्या रागावर नियंत्रण राहते. तसेच आपण ध्यान (meditation) करा आपल्याला लाभ होईल, प्राणायम चा नियमित अभ्यास करा संतुलित आहार करा, जेंव्हा पण आपल्याला राग येईल तेंव्हा काहीतरी मनात ल्या मनात गुणगुणत जा अस केल्याने आपला राग शांत होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

Leave a Comment