हातापायाचे सौदर्य वाढविण्यासाठी | How to enhance the beauty of the hands and legs

१. पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो.

२. उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांचा मसाज करावा.

३. लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो.

४. थंडीच्या दिवसांत हाता – पायांना लवंग, तेल, बदामतेल, कोल्डक्रिमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो.

५. आठवडयातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून १० मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौदर्यही वाढते.

६. पायांना भेगा असल्यास ग्लिसरीन किंवा लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो.

७. तळव्याची त्वचा पातळ असल्याने तिची योग्य ती काळजी घेतली नाही तर ती सुरकुतते. सततच्या डिटर्जंट किंवा भांडी घासण्याच्या साबणाचा वापर झाल्यानेही त्वचा खराब होते. थंडीत तर जास्तच.

८. बेसिनजवळ एका बाटलीत ग्लिसरीन + लिंबाचा रस + गुलाबपाणी एकत्र करून ठेवा. प्रत्येक वेळी हात धुतल्यावर थोडेसे हातावर चोळा.

९. हातांची साले निघत असल्यास कोमट पाण्यात मक्याचे पीठ मिसळून ५ मिनिटे लावून ठेवा. रोज ५ ते १० मिनिटे केल्यास फरक पडेल.

१०. हाताला स्क्रब म्हणून साखर +लिंबूरस हातावर चोळा. म्हणजे हातावरील मृत त्वचा निघून जाईल व हात कोरडे पडणार नाहीत.

११. कांदा भाजून त्याची पेस्ट करून ती भेगांवर लावा. भेगा भरून येतील.

१२. काळवंडलेल्या हातांसाठी ३-४ कपूरवड्या + १ चमचा दही हे मिश्रण आंघोळीच्या आधी १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि आंघोळीच्या वेळी धुवा.

१३. रापलेल्या कोपरांसाठी पिकलेला टोमॅटो चोळा. १५ मिनिटांनी धुवा.

१४. रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन क्रीम (लोणी किंवा तूपही चालेल) किंवा बॉडी लोशन लावावे. शक्य असल्यास त्यावर मोजे घालावेत. नियमित काळजी घेतल्यास, त्यावर आलेल्या मृत त्वचेचा थर मागे केल्यास, चुकीच्या किंवा अतिप्रमाणात प्रसाधनांचा वापर न केल्यास आपण नखांना आरोग्य देऊ शकतो.

१५. दोन मोठे चमचे पपईच्या गरात दोन लहान चमचे मिसळावे. त्यात थोडी साखर घालावी. या पेस्टने हातांना मालीश करावी. त्यानंतर कोमट पाण्याचे हात धुऊन टाकावेत. असे केल्यास हातांची त्वचा कोमल बनते.

१६. अंघोळ करण्याआधी कोमट दुधाने हातांना मालीश केली पाहिजे, त्याने हाताच्या त्वचेत निखार येतो.

१७. एक वेळ स्मॅश करून त्यात एका लिंबाचा रस घालावा. त्या पेस्टला हातांवर लावावे. दहा मिनिटांनी पाण्याने हात धुवावे. असे केल्याने हाताची चमक वाढते.

१८. गरम पाणी व गार पाणी असे एकाआड एकदा पाय बुडवावेत व काढावेत. शेवटी गरम पाण्यातून काढावेत. टाचांच्या जाड त्वचेतील रक्ताभिसरण सुधारल्याने टाचा दुखणे कमी होते.

१९. टोमॅटोचा रस, लिंबाचा रस आणि कच्चे दूध एकत्र करून त्याचे मिश्रण हातांवर चोळले पाहिजे. त्यामुळे हातांचा रंग उजळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *