चेहऱ्यावरील वांग (Pigmentation) कसे कमी कराल

– वांग ला आधुनिक वैद्यकीय भाषेत मेलास्मा (Melasma) म्हणतात. हा आजार ३० ते ६० पर्यंत कोणत्या ही वयात, स्त्रियांना व पुरुषांना दोघांना ही होऊ शकतो. मात्र स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.

– वांग चे डाग चेहऱ्यावर विविध कारणांमुळे दिसतात.

१. एक तर हार्मोन्स च्या प्रभावामुळे. म्हणूनच गरोदरपणात जिथे हार्मोन्स कमी जास्त होत असतात अशा अवस्थेत हे डाग उमटू शकतात.

२. ज्या बायका गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात त्यांच्यात ही अनेकदा हे डाग चेहऱ्यावर दिसू लागतात.

३. पण हल्ली हे डाग पुरुषांमध्ये ही दिसू लागले आहेत. कामानिम्मित पुरुषांना उन्हात जास्त फिरावं लागतं. म्हणून उन्हाच्या अतिनील किरणांच्या प्रभावामुळे, त्वचेतील रंगपेशी त्वचेच्या संरक्षणासाठी रंग निर्माण करायला लागतात.

४. अनुवंशिकते मुळे सुद्धा वांग निर्माण होऊ शकतो.

५. हल्ली जीवनशैलीत परिवर्तन आल्यामुळे वांग कधीही निर्माण होताना दिसतो. त्याची कारणं अशी- सतत ची धावपळ, अव्यवस्थित आहार, जागरण (विशेषतः रात्रीचे शिफ्ट्स करणारे) ई. अशावेळी संप्रेरक अनियमित काम करायला लागतात व म्हणून वांग निर्माण होतो.

६. अनेक कॉस्मेटिक क्रिम्स आहेत उदाः फेअरनेस क्रिम्स किंवा फेसियल-्ब्लिच मेपअप चे पदार्थ ज्या मुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊन वांग निर्माण होऊ शकतो. थायरोईड ग्रंथी च्या आजाराबरोबर वांग दिसू शकतो.

७. रात्रीचे नित्यनियमाने जागरण, सतत उन्हामध्ये फिरणे, चिडचिडा स्वभाव, मानसीक ताण, मानसिक आघात, सतत चिंता, भांडखोर स्वभाव, पित्त प्रकृती यामूळे देखील प्राकृत पित्त प्रकुपित होऊन चेहरयावर वांग निर्मिती होते.

– स्वरुप :

१. वांग चे डाग तपकिरी ते काळे रंगाचे व विविध आकाराचे चट्टे म्हणून चेहऱ्यावर दिसू लागतात. अनेकदा, स्त्रियांमध्ये, पाळीच्या दिवसांमध्ये ते गडद दिसतात आणि इतर दिवसांमध्ये फिकट. अनेक लोक असं ही सांगतात की उन्हात ज्या दिवशी जास्तं फिरणं होतं त्या दिवशी डाग गडद दिसतात.

२. हे डाग कपाळावर, गालांवर, नाकावर व वरच्या ओठांवर , गालांवर, जबड्यावर , कानांच्या समोर जो गालाचा भाग आहे तिथे डाग निर्माण होऊ शकतात

– उपचार :

१. वांग च्या उपचारामध्ये सर्वात महत्वाचा उपचार म्हणजे उन्हापासून संरक्षण.

२. चेहरयावर विविध क्रिम्स्, पावडर, साबणी, फेसवॉश इतर सौदर्य प्रसाधने यांचा भडिमार थांबविणे.

३. चेहरा नेहमी स्वच्छ ठेवणे.

४. आहारात भरपुर पालेभाज्या-फळांचा वापर करणे

५. आवश्यक तेवढे पाणी प्यावे.

६. अनावश्यक रात्रीचे जागरण टाळावे, शांत झोप घेण्याचा प्रयत्न करावा.

७. ध्यान धारणा-शवासन-योगासने-नियमित व्यायाम करावा.

९. आयुर्वेदिक तद्याद्वारे रक्तशुध्दीकर-पित्त शामक किंवा आजानुसार औषधी घ्याव्यात.

१०. मंजिष्ठा मधात वाटून त्याचा लेप वांगावर करावा.

११. जायफळाचा लेप लावावा.

१२. मसूर दुधात वाटून त्यात तूप मिसळून त्याचा लेप लावावा. आयुर्वेद सांगतो, असा लेप लावल्याने चेहेरा ७ दिवसात कमळाप्रमाणे सुंदर होतो.

१३. रक्तचंदन, लोध्र आणि कोष्ठ यांचा लेप लावावा

Leave a Comment