वजन कमी करण्याचे उपाय – How to reduce your Weight

वजन कमी करणे हे सोप आहे, आपल्या आहारात येणारे मसाले ज्यांच्या मुळे आपला आहार स्वादिष्ट बनतो तेच आपल्याला कितीतरी आजारांपासून वाचवतात, कमजोरी येणे, जास्त वजन वाढणे इतर समस्या ज्यांच्यावर आपण घरगुती उपाय करू शकता. आजकाल जाडेपणा हि समस्या सर्वांनाच भेडसावत आहे, यामुळे लोकांना काही घातक आजारांना सामोरे जावे लागते उदा. सांधेदुखी, कॅन्सर, अनिद्रा, डायबेटीज, इत्यादी. या आजारांवर उपाय करण्यासाठी लोक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात आणि वेगवेगळे उपाय करून बघतात पण बऱ्याचदा त्यांना याचा फायदा होत नाही. या समेसेच्या निवारणासाठी आपण घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून वजन नियंत्रित करू शकता.

जर तुम्ही आपल्या वाढणाऱ्या वजनाने त्रस्त झाला असाल तर आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्यांचा वापर करून वजनावर नियंत्रण ठेऊ शकता. वाढत्या वजनामुळे बऱ्याचदा आपण घेतलेले महागडे कपडे आपल्याला बरोबर बसत नाहीत, काही लोक साधे कपडे परिधान करून देखील ते त्यांच्यावर चांगले दिसतात कारण सेहतमंद व तंदुरुस्त शरीरावर कोणतेही कपडे चांगले दिसतात, म्हणून आपण स्वतःला तंदुरुस्त व आकर्षित दिसण्यासाठी थोडी मेहनत करावी.

१५ दिवसात वजन कमी करण्याचे उपाय :- काही मसाले असे आहेत ज्यांच्या निरंतर वापराने वजन कमी करू शकता उदा. हळद हा मसाला वजन कमी करण्यासाठी सर्वात म्हत्वपूर्ण आहे. कारण हळद शरीरातील चयापचन क्रियेत वाढ करते. ज्यामुळे आपली पचन शक्ती वाढते, म्हणजेच आपण जे काही खातो त्याचे पचन चांगल्या रित्या होते, पचन क्रिया मजबूत होते. या व्यतिरिक्त (Alzheimer)अल्ज़्हेइमेर या सारख्या आजारांचा धोका कमी करते. हळद सौंदर्य वाढवण्या साठी तसेच पदार्थाचा स्वाद, रंगत वाढवणारा याच्यात मिळणारा ( curcumin )कुरकुमीन तत्व वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे

दालचिनीचा उपयोग जास्त करून पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो, दालचिनी स्वाद तर वाढवते त्याच बरोबर शरीरात वाढलेल्या मेटाबॉलाइज कमी करतो तसेच रक्तात वाढलेली शुगर नियंत्रित करतो. आणि दालचिनी खाल्याने भूक पण कमी लागते, ज्यामुळे नको असलेली चरबी शरीरावर जमा होत नाही. लाल मिरची जेवढी तिखट आहे तेवढी उपयोगी देखील आहे, लाल मिरची मुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, व आपले वजन कमी होण्यास मदत होते.

जीरा, लसून, आल, आणि राई हे देखील आपले वजन कमी करण्यास उपयोगी आहेत.

जीरा आणि आल हे असे मसाले आहेत ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते, फक्त एक चमचा जीरा खाल्याने शरीरातील चरबी चे प्रमाण कमी होण्यास मदत होते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आल फक्त गुणकारी मसाला नाही तर आल हे एक प्रकारे औषधच आहे, आल देखील आपल्या शरीरातील रक्तातील शुगर चे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो. आणि हे मसाले आपले वाढलेले वजन नैसर्गिकरीत्या कमी करतात, राई देखील एक महत्वपूर्ण मसाला आहे एका संशोधना नुसार रोजच्या जेवणात जर ३ ते ४ चमचे राई टाकल्याने चयापचन क्रियेत २५% ने वाढ होते. याच बरोबर एका तासात ४५ कॅलरीज कमी होतात.

लसणा मध्ये देखील खूप गुणकारी तत्व असतात, लसणा मुळे वेगवेगळ्या शारीरिक कमजोरी दूर होण्यास मदत होते, यामुळे पदार्थ स्वादिष्ट तसेच पौष्टिक तर बनतात त्याच बरोबर वजन कमी करण्यास मदत करतो. काळी मिरी देखील खूप गुणकारी आहे काळी मिरी मुळे चरबी चे प्रमाण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. हा मसाला नव्या (fat) कोशिकांचे गठन होऊन देत नाही, ज्यामुळे वजन वाढत नाही, आणि हा एक थर्मोजेनिक मसाला आहे ज्यामुळे शरीरातील चयापचन क्रियेत वाढ होण्यास मदत होते, ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment