डोळ्यांचे सौंदर्य

1) डोळे स्वच्छ व चमकदार राहण्यासाठी काही खास गोष्टी :-

१) संगणकावर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात . अशा वेळी दर दोन ते तीन तासाने पाण्याचा हबका डोळ्यावर मारावा . मग सुती कपड्याने किंवा रुमालाने डोळे हलकेच टिपावे .

२) हिरव्या झाडाकडे , फुलदाणीतील फुलांकडे आल्हाद दायक गोष्टीकडे मध्ये-मध्ये पाहावे . डोळ्यांना प्रसन्न वाटते .
३) काकडीच्या थंडगार चकत्या , मोगऱ्याचा गजरा , बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे . फ्रीजमधील टी Bags ही ठेवता येतात .

४) गाजराचा कीस , बीटाचा कीस , कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या आवती-भोवती हलका मसाज करावा . डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील .

2) डोळ्यासाठी आहारात खालील गोष्टी घ्या :-

डोळ्यांसाठी आहारात फळांचा समावेश होणे आवश्यक आहे . जसे त्यामध्ये अ जीवनसत्वाने युक्त असलेले संत्री , टरबूज , पपया , आंबा इ. फळांचा समावेश करावा . दुधाचे पदार्थ म्हणजेच दुध , पनीर , दही , ताक व तसेच अंड्यातील पिवळा बलक , पालेभाज्या , भोपळा , गाजर , टोमाटो , कॉडलिव्हर ऑइल , चीज , लिंबूवर्गातील फळं , केळी , सूर्यफुल बी इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात करावा .

Leave a Comment