आहारात घ्यायची फळे | Important Dietary fruits in marathi

आजारांवर फळांचा रामबान उपाय –

1. डाळिंब :-

१. डाळिंबामधे व्हिटामिंन्स ए ,सी ,ई बरोबरच फ्लोरिक असिड या रासायनिक घटकांबरोबरच अंटि ऑक्सिडंट मोठया प्रमाणात असते .

२. फुफ्फुस,यकृत ,हृदय या रोगांवर डाळिंब उपयुक्त आहे .

३. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात .

४. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे .

५. छातीत दुखत असेल तर डाळिंबदाण्यां चा ३ चमचे रस खडीसाखर मिसळून घेतले की आराम वाटतो .

६. काविळ झाली असेल तर ६ चमचे डाळिंबाचा रस ,त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून दिवसातून २ वेळा सकाळी आणि सायंकाळ घ्या पिवळे पण जाऊ न काविळ बरी होईल.

७. मुलांना खोकला झाला असेल तर डाळिंबाचा रस ,मध व साखर मिसळून चाटवावा म्हणजे खोकला थांबेल .

2. अंजीर:-

१. अंजीरातून शरीराला लोह तसेच व्हिटामिन ए ,बी ,सी हे भरपूर प्रमाणात मिळते .

२. अपचनाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळ संध्याकाळ १-२ अंजीर घ्यावे किंवा रस घ्यावा .

३. अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात.

४. त्वचेची आग होणे ,त्वचा विकार,व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.

५. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते.

६. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात.

3. द्राक्षे :-

१. पोटदुखी, आंबट ढेकरा,घसा जळजळणे, घशाशी येणे,उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी.

२. द्राक्षापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे.

३. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते.

४. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो.

५. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते.

4. जांभूळ:-

१. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार थांबते.

२. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

३. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

४.जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.

5. पपई :-

१. पपईचा चीक खरूज ,नायटा ,गजकर्ण,या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो.

२. जंतावर पपई हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध २-२ चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना १/२ चमचा तीन दिवस दयावा . जंत पडून जातात .

३. पपई रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचन्यास मदत होते .
४. गर्भवती स्त्रियांनी पपई फळ खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

6. सफरचंद:-

१. सफरचंदामधे अंटीडाय ऑक्सिडंत असते त्यामुळे ते कन्सरपासून शरीराची सुरक्षा करते .

२. सफरचंदामधे पोटैशियम, कैंल्शियम, फासफोरस, मैग्नीशियम, आयरन व जिंक असते जे आपली त्वचा निखारते .

३. सफरचंद खाल्ल्याने चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यास मदत होते . स्किन तजेदार राहते .

४. सफरचंदात व्हिटामीन ए आणि इ असते .

५. सफरचंद आपल्या पचनक्रियेला नियंत्रित ठेवते.

6. पेरू :-

१. पेरू खाल्ल्यास हिरडयातून व नाकातून रक्त वाहने थांबते .

२. पेरू खाल्ल्यास श्वासदुर्गंधी नाहीशी होते .

३. हाडे मजबूत होतात .

४. पेरू शरीरातील रक्ताल्पता कमी करतो .

५. संधिवात व सांधे दुखण्याच्या त्रासातून आराम मिळतो .

7. आवळा :-

१. आवळे चावून खाल्ल्यास दात मजबूत होतात .

२. आवळ्याचे चूर्ण ,तूप आणि साखरेत सम प्रमाणात मिसळून खाल्ल्यास डोकेदुखी नाहीशी होते.

३. पित्त विकारासाठी आवळा फायदेशीर असतो .

४. १ ग्रॅम आवळ्याचे चूर्ण मधातून घेतल्यास बसलेला घसा नीट होतो .
५. १ आवळ्याचा ताजा रस व १ चमचा आवळा रोज घेतल्याने हृदय रोगास फायदेशीर असते .

8. मोसंबी:-

१. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते.
२. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात.
३. मोसंबीची ताजी साल चेहऱ्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
४. मोसंबीची साल वातहारक असते .
५. अन्नपदार्थाना स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरला जातो .

8. टरबूज :-

१. टरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरिरातील पाणी संतुलीत ठेवण्याचे काम टरबुज करते.

२. मधुमेहाचा आजार असणारयांनी टरबूजाचे सेवन करावे .

३. हृदयाशी संबधीत आजार असलेल्यांसाठी टरबुज अधिक उपयुक्त ठरते.
४. शिवाय टरबुजामध्ये विटामिन ए, सी. आणि बी ६ हे जीवनसत्व असतात .
५. उन्हाळय़ाच्या दिवसांमधील एक महत्वपूर्ण फळ म्हणून ओळखले जाते.

9.लिंबू :-
१. मळमळ होऊ लागताच लिंबू खावे.
२. लिंबाच्या बियांचे चूर्ण करून पाण्यातून घेतल्यास पोटातील कृमी मरतात .
३. लिंबाच्या साली वाळवून बनविलेल्या चुर्णाने दंतमंजन केल्यास दात स्वच्छ होतात .
४. लिंबाचा रस आल्याचा रस व मध एकत्र प्यायल्यास पोटदुखी बरी होते .
५. लिंबाचा रस कपभर पाण्यात मिसळून दिवसातून ४-५ वेळा घेतल्यास जुलाब थांबतात .
६. लिंबाच्या रसात , तुळशीच्या पानांचा व कडुलिंबाच्या लिंबोळयाचा रस मिसळून प्यायल्यास मलेरियाचा ताप उतरतो .

Leave a Comment