कर्णबधिरता ( समज-गैरसमज ) | Hearing Loss In Marathi

१. जर कमी वयात एखाद्याला बहिरेपणा आला तर ज्याप्रकारचे संभाषण त्याने आत्मसात केलेले असते ते सर्व तो विसरतो म्हणून अशा अवस्थेला बहिरेपणामुळे आलेला मुकेपणा अथवा जास्त प्रमाणात बहिरेपणाची अवस्था ज्यात सदोष बोलणे असते. फक्त संवेदनावाहक ज्ञानतंतूमुळे येणारी बहिरेपणाची अवस्था अशी असते की ज्यामध्ये मुकेपणा देखील येतो.

२. बहिरेपणा आला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो वाढल्यावर इलाजासाठी धाव घेतात. हा आजार असलेले लोक दुसऱ्याशी बोलणे टाळतो, निराशा व कमीपण वाटत असल्याने समाजापासून दूर राहतो व परित्यक्त जीवन जगतो, कधी कधी हा मानसिक ताण इतका असह्य होतो की, त्याला रक्तदाबाचा विकार जडतो. कानाच्या विविध प्रकारच्या भागांवर हा बहिरेपणा अवलंबून असतो.

३. जगात बहिरेपणाच्या त्रासाने त्रस्त झालेल्यांची संख्या काही कोटीच्या घरात आहे. काही लोकांना जन्मत: कमी ऐकायला येते, तर काहींना म्हातारपणी हा त्रास होतो, तर काहींना मध्यम वयात बहिरेपणा येतो.

४. बहिरेपणा आला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो वाढल्यावर इलाजासाठी धाव घेतात. हा आजार असलेले लोक दुसऱ्याशी बोलणे टाळतो, निराशा व कमीपण वाटत असल्याने समाजापासून दूर राहतो व परित्यक्त जीवन जगतो, कधी कधी हा मानसिक ताण इतका असह्य होतो की, त्याला रक्तदाबाचा विकार जडतो. कानाच्या विविध प्रकारच्या भागांवर हा बहिरेपणा अवलंबून असतो.

५. काही विशिष्ट अवस्था व कारणे :

६. बाह्यकान : मेण अथवा मळ (सर्वसाधारणपणे मुख्य कारण) बुरशी, बाह्य कानाचा आजार, बाह्य पदार्थ, अनैसर्गिक वाढ, मेंदूचा आजार, आकुंचन, मार्ग बुजणे, टण्णू अथवा वाढ.

७. मध्य कान : कानाचा ड्रम आणि ऑसीकलस्‌ मध्ये जन्मजात दोष असणे.

दुखापत – बॅरोट्रॉमा, कानाचा ड्रम फाटणे, पडद्यामध्ये रक्तस्त्राव होणे, ऑसिक्‍युलरमध्ये दोष निर्माण होणे, सुली या भागाच्या खालच्या भागाचे हाड मोडणे.

सूज येणे – मध्ये कानामध्ये त्वरित जंतुचा प्रादुर्भाव होणे, मध्य कानामध्ये नेहमी जंतुचा प्रादुर्भाव होणे, पाणी होणे, मध्यकानामध्ये अवयव एकमेकाला चिकटणे.

८. युस्टेशियन नलिका :

– युस्टेशियन नलिकेतील नाजूक त्वचेचा दाह (नियमित आढळते)

– कान, कानाजवळील पोकळ्या आणि घसा यांना हानी झाल्यामुळे युस्टेशियन नलिकेची कार्यक्षमता कमी होतो.

९. बॅरोट्रामा : इतर कारणे – कानाचा पेशीसमूह कठीण होणे.

१०. संवेदनावहक ज्ञानतंतूमुळे येणारा बहिरेपणा : बहिरेपणा मुकेपणा (सदोष वेग – बोलण्याचा आणि प्रखर बहिरेपणा) कुठल्याही कारणामुळे एखाद्या वर्ष वयापर्यंतच्या मुलाला बहिरेपणा आला, तर त्याचे बोलणे तुटक होते. अथवा तो मुका होतो किंवा बोलणे आत्मसात करता येत नाही.

११. बोलण्याच्या संबंधातील केंद्रे आणि अवयव जरी व्यवस्थित असले तरी असे घडते. ज्या माणसाने शब्दच ऐकलेले नाहीत अथवा तुटक शब्द ऐकलेले आहेत तो बोलू शकत नाही. अथवा तुटकतुटकच बोलतो, की, ज्या प्रकारचे त्याने ऐकलेले असते.

१२. जर कमी वयात एखाद्याला बहिरेपणा आला तर ज्याप्रकारचे संभाषण त्याने आत्मसात केलेले असते ते सर्व तो विसरतो म्हणून अशा अवस्थेला बहिरेपणामुळे आलेला मुकेपणा अथवा जास्त प्रमाणात बहिरेपणाची अवस्था ज्यात सदोष बोलणे असते. फक्त संवेदनावाहक ज्ञानतंतूमुळे येणारी बहिरेपणाची अवस्था अशी असते की ज्यामध्ये मुकेपणा देखील येतो.

१३. क्षयरोग आणि मध्यकानांमध्ये गुप्तरोगाच्या जंतुचा प्रादुर्भाव हे प्रकार नियमितप्रमाणे आढळत नाहीत. टण्णू अथवा वाढ क्वचित पणे आढळते.

१४. याशिवाय पुढील कारणांनी बहिरेपणा येतो.

– कर्णनलिका लहान असते

– कानात मळ साचणे

– कानाच्या पडद्याला भोक असणे

– कानातून पू येणे

– म्हातारपण

– तापात जास्त प्रमाणात अँटी – बायोटेक्‍स घेतल्यामुळे

– जन्मत: बहिरेपणा

– डोक्‍याला मार बसल्यामुळे

– सतत यंत्राची घरघर ऐकल्यामुळे

– तापाने येणारा बहिरेपण

– सर्दी झाल्यामुळे येणारा बहिरेपणा

– श्रवणयंत्राचे सर्वसाधारणपणे चार प्रकार असतात.

– पॉकेट मॉडेल

– कानामागचे अदृष्य मॉडेल

– चष्म्याच्या दांडीत असते

– कानातील मॉडेल (आय.टी.सी.) अत्यंत लहान व अदृष्य

१५. बहिरेपणाचे प्रकार :

. प्रवाही बहिरेपणा

. मज्जातंतूचा बहिरेपणा

१६. प्रवाही बहिरेपणा :

– हा प्रकार मध्य कर्णातील हाडे एकमेकांत घट्‌ट बसल्यामुळे होता. मध्यकर्णातील हाडे घट्‌ट बसल्यामुळे पडद्यावर आवाज आदळून कंपन आंतरकर्णापर्यंत नीट पोहचत नाही. त्यामुळे कमी कंपनाचे शब्द उदा. बाबा, मामा, दादा नीट ऐकू येत नाहीत. यावर माणसाची प्रकृती धडधकाट असल्यास ऑपरेशन शक्‍य आहे, नाहीतर श्रवणयंत्राने चांगला फायदा होतो.

१७. मज्जातंतूचा बहिरेपणा :

– या प्रकारात वेसीलर मेसब्रेनच्या तंतूचा नाश होतो. निमुळत्या टोकावरील तंतू नष्ट झाल्यामुळे असा बहिरेपणा येतो. त्यामुळे क्ष, स, श, थ, फ आणि व या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द नीट ऐकू येत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे श्रवणयंत्र लावणे.

१८. संमिश्र बहिरेपणा :

– संमिश्र बहिरेपणामुळे प्रवाही व मज्जातंतू असे दोन्ही प्रकारचे बहिरेपण असते. याला मशीन लावल्यावर शेकडा टक्के लोकांना ताबडतोब चांगले ऐकू येते. उरलेल्या टक्के लोकांना थोडे जास्त दिवस लागतात.

– वहन प्रकारचा बहिरेपणा, कानामधील वहनशक्ति करणाऱ्या अवयवांमध्ये दोष निर्माण झाल्याने येतो. उदा. बाह्यकान आणि मध्य कान बाहेरील कानाचा भाग अथवा पोकळी, कानाचा पडदा, कानाच्या हाडांची साखळी, पडद्यामधील पोकळी अगदी त्रिकोणी आकाराच्या खिडकीपर्यंतचा भाग अशा कुठल्याही अवयवांमध्ये दोष निर्माण झाल्यास वहन प्रकारातील बहिरेपणा येतो.

१९. संवेदनावाहक :

– ज्ञानतंतूमुळे येणारा बहिरेपणा (आकलन कमी करणारा बहिरेपणा) हा लेबिरिंथ, आठ मज्जातंतू आणि त्यांच्या मुख्य फांद्या यांना इजा झाल्यास निर्माण होतो. यामुळे मनातून उगम पावणारी बहिरेपणा निर्माण होतो.

२०. संमिश्र बहिरेपणा :

– जर वहन पध्दतीचा आणि संवेदनावाहक – ज्ञानतंतूमुळे होणारा बहिरेपणा असे दोन्ही असतील तर त्याला मिश्र प्रकारचा बहिरेपणा म्हणतात.

२१. बहिरेपणा वहन पध्दतीचा संवेदनावाहक – ज्ञानतंतु पध्दतीचा :

– पेशींमध्ये बदल झालेली जागा बाह्यकान आणि मध्यकान आंतरकान, आठ मज्जातंतू आणि मुख्य फांद्या रिंस टेस्ट हवेपेक्षा हाडामध्ये हवेमध्ये चांगल्या प्रकारचे वहन चांगल्या प्रकारचे वहन असते.

– वेबर टेस्ट्‌ खराब कानामध्ये चांगल्या कानामध्ये प्रचंड असते. प्रचंड असते.

– शुध्द आवाजाची हाडांच्या वहनांची मर्यादा हवा आणी हाडे यांच्या वहनाची ऐकण्याची चाचणी बदलत नाही. हवेच्या मर्यादा वाढते. वहनाची मर्यादा वाढते.

– ऐकण्याची क्षमता कमी होणे डीबी पेक्षा जास्त नाही. डीबी पेक्षा जास्त असू शकते.

– बोलणे हळू आवाजात बोलतात, मोठ्याने बोलतात.

– बोलणे ओळखण्याची अथवा चांगली वाईट त्यातील तफावर ओळखणे.

– भरती नसते.

२२. व्यवस्थापन :

– अशा मुलांची काळजी घेण्यास सुरूवात करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यांचे शाळेत जाण्याचे वय होईपर्यंत त्यासाठी थांबू नये.

– श्रवणशक्ती वाढविण्यासाठी उपाय. ऐकण्याच्या यंत्राचा वापर लवकरात लवकर सुरू करावा. अगदी एक वर्षाखालील मुलांना सुध्दा ते वापरण्यास देता येते.

– संभाषण सुधारणे.

२३. संभाषण उपचार :

– अशा मुलांची संभाषण पध्दती सदोष नसते. म्हणून त्यांचे बोलणे सुधारण्यासाठी संभाषण उपचार तज्ञ अथवा बहिरेपणावर उपचार करणारे शिक्षक यांच्या तर्फे विशिष प्रशिक्षण देण्यात यावे.

– हे तज्ञ नक्कल करणे अथवा स्पर्श पध्दतीद्वारे संभाषण करण्यास उत्साहित करतात. कानामध्ये सूं असा आवाज होणे हा प्रकार देखील आढळतो. अंर्तकर्णातील पोकळीमध्ये असलेल्या केशमुळांना दुखापत झाल्यास ते व्यवस्थित करणे अशक्‍य असते म्हणून ध्वनिप्रदूषणामुळे दुखापत न होऊ देणे महत्त्वाचे असते.

– कारखान्यातील कामगारांसाठी आवाजाची सुरक्षित पातळी डीबी आवाज आठवड्यातून तास असावी.

२४. प्रतिबंध : व्यवस्थित कार्यक्षम बोळा कानात घालणे आणि नियमित श्रवणमापन यंत्राद्वारे तपासणी केल्यास आवाजामुळे निर्माण होणारा बहिरेपणा थांबविता येतो. जास्त आवाजामध्ये जाण्याचे कमी करावे आणि मुख्यत्वेकरून ध्वनी प्रदूषण टाळावे.

Leave a Comment