जायफळ | Jaiphal (Nutmeg) Health Benefits In Marathi

1) जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत

2) जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो.

3) जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाल लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्यावरील डाग नाहीसे होतात.

4) संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.

5) पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2-3 थेंब साखरेत मिसळून खावेत.
6) दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो.

7) सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळविण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते.
8) बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो.

9) बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठिण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.

Leave a Comment