जांभूळ | Jamun Eating Benefits In Marathi

– जांभूळ हे अत्यंत पाचक आहे.

– तसेच जांभूळ हे अतिसार थांबविणारे औषध आहे.

– जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.

– शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात.

– जांभळीची साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा, दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते.

– स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते.

– चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात.

– जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते.

– जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो.

– जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

– मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

– जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते.

– तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात.

– जांभूळ रक्त शुद्ध करते.

Leave a Comment