ज्येष्टमध | Jeshthamadh (Mulethi) Benefits In Marathi

1) स्वरभंगावर यष्टिमधुचूर्ण तूपसाखरेबरोबर द्यावे.
2) उलटीमध्ये पित्त पडत असल्यास जेष्टमध व रक्तचंदन ही दुधात उगाळून द्यावीत.

3) लघवीला त्रास होत असल्यास जेष्टमधचूर्ण दूधात शिजवून ते पिण्यास द्यावे.
4) खोकला व दम्यामध्ये कफ सुटण्यासाठी यष्टीमधूचा काढा मध व खडी साखर घालून द्यावा.

5) जोडीला मधाचा वापर केल्याने कफ प्रकोप होण्याचा धोका टळतो.
6) विषविकारावर याचा काढा मधाबरोबर द्यावा.

7) श्वेतेप्रदरात यष्टिमधुचूर्ण तांदूळाच्या ध्रुवणात उगाळून साखरेबरोबर द्यावी.
8) व्रणामध्ये यष्टिमधुचूर्ण तेलात शिजवून ते तेल व्रणरोपणावर वापरावे.

9) रक्तरोगावर श्वेतचंदन व जेष्टमध यांचा काढा करून द्यावा.
10 अतितहान लागत असेल तर जेष्टमधाचा काढा वापरावा.

Leave a Comment