लिंबु | Lemon Eating Benefits In Marathi

– लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

– लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते.

– पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.

– अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे.

– लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.

– पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे.

– लिंबाने भूक वाढते.

– लिंबाचा रसाने अन्न पचते व शौचास साफ होते.

– मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस, पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो.

– वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.

– अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो.

– नायटा व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

Leave a Comment