मैदा: एक विष | मैद्या मुळे होणारे आजार | Maida Flour Side Effects in Marathi

मैदा: एक विष | मैद्या मुळे होणारे आजार | Maida Flour Side Effects in Marathi

वजन कमी कारणाऱ्यांनी मैदापासून बनविलेले पदार्थ खाऊ नयेत. मैदा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दिसून येतो ज्यापासून खूप असे पदार्थ बनविले जातात. पण आपण कधी हा विचार केला आहे का की मैदा हा आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.

मैदाचे पिठ कसे तयार केले जाते?

गव्हाच्या पीठापासून ९७% फायबर वेगळे केल्यानंतर मैदा तयार करतात. मैदा नरम व पांढरा बनविण्यासाठी ऍलॉक्झनला हे अर्क वापरले जाते.

मैदापासून बनवलेल्या बहुतेक पदार्थ खूपच स्वादिष्ट असतात, पण हे प्रत्यक्षात आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. नाश्ता म्हणून आपण जे ब्रेड वापरतो ते मैदाचे बनलेले असते. रुमाली रोटी, नान, केक्स, पेस्ट्री, बहुतेक भाजलेले पदार्थ, बिस्किटे, स्नॅक्स, पास्ता, नूडल्स, समोसे हे देखील मैदाचे बनलेले असते. मैदा सर्व जंक फूडमध्ये आढळतो. पण मैदा हा एक असा पदार्थ आहे जो निरोगी आरोग्यासाठी टाळायला हवा.

जेव्हां आपण मैदापासून बनवलेले तळलेले पदार्थ सेवन करतो – उदा. समोसे, चकली, तळलेले नूडल्स, कचोरी, पुरण पोळी, चीज पास्ता तेव्हा शरीरातील चरबी आणि शुद्ध कार्बोन्स प्रमाणाबाहेर वाढते, ज्यामुळे आपल्या अन्न पचनामध्ये बाधा येते तसेच सूज येणे, मधुमेह, हृदयरोग, संधिवात, अलझायमर आणि अगदी कर्करोग सुद्धा अति मैदा खाल्याने होऊ शकतो.

 तर चला मग जाणून घेऊया मैद्या मुळे होणारे नुकसान.

1) मैदा लठ्ठपणा वाढवितो

जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून रक्तात ट्रायग्लिसराइड वाढतात. आपल्याला वजन कमी करायचे असल्यास मैदापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून वगळाव्या.

2) मैदा पोटासाठी हानिकारक

मैदा पोटासाठी योग्य नाही कारण त्यात फायबर नसतात व त्यामुळे मल घट्ट होतो.

3) फूड अॅलर्जी

मैद्यात ग्लूटन असल्यामुळे फूड अॅलर्जी होते. मैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात याऊलट गहूत भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटीन असते.

4) हाडे कमजोर होणे

मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे असे पीठ हाड़ातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात.

5) रोग होण्याचे प्रमाण वाढते

मैदा नियामित खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.

6) मधुमेहाचा धोका

मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लाइसेमिक(glycemic) निर्देशांक असतो. म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर मग आपल्याला स्वादुपिंडाची तक्रार सुरू होईल कारण ती एकदाच इंसुलिने ठीक होईल परंतु पुन्हा पुन्हा वापर करावा लागल्यास स्वादुपिंडाचे काम कमी होवून शरीरातील इन्सुलिन वाढेल आणि आपणस मधुमेह होईल.

7) संधिवात आणि हृदयरोग

जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते, नंतर शरीरात रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्यामुळे संधिवात आणि हृदयरोग उद्भवतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment