१५ मिनिटात चेहरा बनवा चमकदार -(Get Glowing Face in 15 Minutes)

लग्न कार्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात, पार्टी मध्ये जाण्या अगोदर काय करावे? लग्न, पार्टी किंवा इतर कार्यक्रमात जाण्यासाठी सगळेच आपण कसे आकर्षित दिसू यासाठी वेगवेगळे उपाय करतात, खासकरून महिला. आपण जास्तीत जास्त सगळ्यांपेक्षा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यांना आपल्या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. लग्न कार्य, पार्टी मध्ये त्यांना फोटो शूट करायला आवडते यासाठी त्या सजतात. पण आजकालच्या काळात त्यांना यासाठी वेळ भेटत नाही आणि स्वताची त्यांना नीट तयारी करता येत नाही .

त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे त्यांना मना नुसार सजता येत नाही. आपण सुंदर दिसत नाही, आपला मेक अप नीट झाला नाही म्हणून त्या फोटो काढायला लाजतात. आणि बऱ्याच वेळा त्यांच्या कडे वेळ नसल्या मुळे त्यांना आपल्या चेहऱ्याची देखरेख करता येत नाही. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स उठणे, डार्क सर्कल, तेलकट त्वचा, शुक्ष्क त्वचा यांसारख्या समस्या होतात. यामुळे आपण आकर्षित दिसत नाही.

आपल्याला लग्नकार्यात, पार्टी किंवा इतर कार्यक्रमात जाण्या आधी आपण काही घरगुती उपाय करून पहा. आपल्या त्वचेवर जमलेली धुळ आणि मृत त्वचा काढायची असेल तर आपण २ चमचे मध, २ चमचे ऑंरेंज जूस (संत्राचा रस) आणि त्यात १ चमचा साखर मिळवा, यात लिंबाचा रस मिळवा आणि मध. संत्राचा रस व साखर एका वाटीत घेऊन चांगले मिसळून घ्या व त्याच्यात लिंबाचा रस टाका आणि नंतर हा मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. लिंबाचा तुकडा आपल्या चेहऱ्यावर हळू हळू फिरवा असे कमीत कमी १५ मिनिटे करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. साखरेचा वापर फक्त पदार्थान मध्ये गोडवा आण्यासाठी होत नाही तर साखरेचे इतर अनेक उपयोग आहेत.

साखर चेहर्याच्या साफ सफाई साठी खूप फायदेमंद आहे. कारण साखरे मुळे चेहऱ्यावरील डाग धब्बे, धूळ दूर होते. आणि याच्यासोबत लिंबाचा वापर केला तर अजून फायदेमंद ठरेल कारण लिंबामध्ये ब्लिचिंग property खूप असते आणि संत्र्यामध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे आपली स्कीन टोन वाढवतात. जर आपण या मिश्रणाचा वापर आपल्या चेहऱ्यावर करत असाल तर आपल्या चेहऱ्यावरील धूळ, डेड स्कीन सेल्स, निघून जाईल आणि याच्या नंतर आपल्याला एक फेस प्याक लावायचा आहे ज्यामुळे आपण सुंदर व आपली त्वचा चमकदार होईल. हा फेस प्याक बनवण्यासाठी ३ चमचे बेसन घ्या व यात बदाम तेल मिळवा आणि यात अर्धा चमचा हळद मिळवा तसेच यात एक चमचा मध आणि थोडा दुध मिळवा आणि चांगल्या प्रकारे हा मिश्रण मिसळून घ्या आणि याची एक पेस्ट तयार होईल हि पेस्ट हलक्या हलक्या हातानी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळा साठी तसेच ठेवा. सुकल्यावर हि सुकलेली पेस्ट हळू हळू काढा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. आपल्याला कदाचित माहित नसेल बेसन च्या पिठामुळे आपल्या चेहऱ्या वरील नको असलेले केस दूर करायला मदत करते. मधा मुळे आपल्या चेहऱ्याची स्कीन कोमल होते व आपल्या त्वचेतील ओलावा (moisture) राहतो. बदामाचा तेलामुळे आपली त्वचा चमकदार होईल. कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जातील व आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल. या प्रक्रीये मुळे आपल्या चेहऱ्यावर लगेच चमक येईल.

या वरील घरगुती उपायांचा वापर करून आपण कोणत्या हि कार्यक्रमात जाऊ शकता. आणि हे खूप कमी खर्चीक आहेत व या मुळे आपला जास्त वेळ सुद्धा वाया जात नाही.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

Leave a Comment