घरच्या घरी Manicure व Padicure करण्यासाठी

1) घरच्या घरी Manicure व Pedicure करण्यासाठी एका टबमध्ये किंवा बादलीत कोमट पाणी घ्यावे . त्यात सौम्य शाम्पू एक चमचाभर टाकावा .

२) खोबऱ्याच्या तेलाचे पाच ते सहा थेंब टाकावे . लिंबू कापून , प्युमिक स्टोन व रुमाल शिजरीच ठेवावा .

३) हात व पाय क्रमाने पाण्यात पाच मिनिटे ठेवावे . लिंबाच्या सालीने हात व पायाला घासावे . पायांसाठी प्युमिक स्टोनचा वापरही करावा .

4) हात व पाय स्वच्छ झाल्यावर रुमालाने टिपून त्यांना मॉइश्चरायझर लावावे .

मऊ मुलायम हातासाठी :-

१) हात मऊ व मुलायम राहण्यासाठी झोपण्यापूर्वी हाताला बेबी ऑइल लावावे .
२) लिंबाचा रस व ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा .
३) थंड पाण्याने हात ओलसर करावे . कणकेचा कोंडा दुधात मिसळून हाताला लावावा . नंतर चोळून हात धुवावे . मुलायम होतात .

• सुंदर कोपारांसाठी :-

१) हाताच्या कोपरांवर लिंबूरस चोळल्यास काळेपणा जातो .
२) ओटच्या पिठात लिंबूरस टाकून पंधरा मिनिटे लावावे .
३) हाताच्या कोपरांवर बेबी ऑइलने मसाज करावा .
४) चेहऱ्याला सनस्क्रीन/मॉइश्चरायझर लावताना हातांच्या कोपरांनाही चोळावे .

Leave a Comment