बाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्यावी ?

१) बाळाला वरचे दूध वाटी-चमच्याने पाजावे. दुधाच्या बाटलीने पाजू नये. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे.

२) एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. ( दूध केंद्रावर मिळणारे दूध पाजावयास हरकत नाही.) पाजण्यापुर्वी कोणतेही दूध चांगले उकळून घेतले पाहिजे. ( पावडरचे दूध असेल तर त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे, अधिक पाणी टाकू नये.) वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल दक्षता घ्यावी नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.

Leave a Comment