गरोदरपणात कंबर व पाय दुखणे

१) बाळाची हाडे आईच्या हाडातील कॅल्शियम पासून बनतात. आईच्या जेवणात कॅल्शियमची कमतरता असल्यास गरोदरपणामुळे आईची हाडे ठिसूळ होतात. यामुळे आईची कंबर व पाय दुखतात.

२) शक्य असेल त्या सर्व स्त्रियांनी दुध, दही, पालेभाज्या, कडधान्ये इत्यादी कॅल्शियमयुक्त आहार घेतला पाहिजे.

३) रुग्णालयात मिळणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या नियमित खाव्यात. या गोळ्या बाळंतपणानंतरही ६ महिने चालू ठेवाव्यात.

Leave a Comment