बाळंतपण

१) पूर्वीचे बाळंतपण सिझेरियन करून झालेले असेल तर प्रत्येक वेळी सिझेरियनच करावं लागेल असं नसतं. नॉर्मल बाळंतपण होऊ शकतं. परंतु अशावेळी पूर्वीच्या गर्भाशयातील व्रण उकळण्याचा संभव असतो. असा धोका निर्माण झाल्यास परत सिझेरियन करून बाळ बाळंतीण वाचवणं हॉस्पिटलमध्ये शक्य होतं. हीच गोष्ट पूर्वी गर्भाशयावर शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांच्यासाठीही आहे.

२) आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात ठराविक वेळी रक्ताची तपासणी करून घेणं आवश्यक असते. तसंच आपल्या ओळ्खीपैकी रक्ताचा गट निगेटिव्ह असलेली हेरून ठेवावी लागते. वेळ पडल्यास अशा व्यक्तींकडून रक्त मिळवता यायला हवं. जन्मणाऱ्या मुलाच्या दृष्टीनं, तसच बाळंतीणीच्या दृष्टीनं हॉस्पिटलमध्ये अशा स्त्रियांचं बाळंतपण होणे अत्यंत आवश्यक असतं.

३ ) पूर्वीच्या बाळंतपणात जर वार पडण्यास त्रास झाला असेल किंवा अंगावरून खूपच गेले असेल, तर त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यत दुसऱ्या वेळी खूप असते. यासाठीच अशा स्त्रियांच बाळंतपण हॉस्पिटलमध्ये केल्यास हा संभाव्य धोका टळू शकतो.

४) पूर्वीच्या बाळंतपणानंतर मूल लगेच गेले असेल तर नीट चिकित्सा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बाळंतपणाची सोय करावी.

५) घरी बाळंतपण करताना जर खूप वेळ गेल्यावरही बाळंतपण होण्याची चिन्हे दिसत नसतील तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे. खूप वेळपर्यंत घरी थांबू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *