मूग | Moog Sprout Benefits In Marathi

– सर्व कडधान्यांमध्ये मूग त्याच्या विशिष्ट गुणांमुळे सर्वश्रेष्ठ समजले जातात.
आजारी माणसासाठी मूग अत्यंत उपयुक्त आहे.

– हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट अधिक गुणकारी व श्रेष्ठ असतात.

– मुगाची खिचडी, आमटी वगैरे पदार्थ बनवले जातात.

– मुगाच्या पिठाचे लाडूही पौष्टिक व स्वादिष्ट असतात.

– मुगापेक्षा मुगाचे पाणी अधिक आरोग्यदायी असते. मुगाचे पाणी वात, पित्त व कफ दूर करणारे असते. त्यामुळे आजारी माणसांना ते अत्यंत हितकर असते.

– एक ते दोन मुठी सालीचे अख्खे मूग मातीच्या गाडग्यात घालून, त्यात एक लिटर पाणी घालून मंद आचेवर शिजवावेत, नंतर ते रवीने चांगले घुसळून घ्यावे व असे पाणी आजारी माणसाला प्यायला दयावे. चवीसाठी पाण्यात जिरे घालून तुपाची थोडी फोडणी, मीठ अगर

– सैंधव घालून ते पाणी घ्यावे. आजारी माणसांना मुगाचे पाणी अत्यंत आरोग्यदायक असते.

– मुगाची आमटी व भात किंवा मुगाची खिचडी देखील आजारी माणसांसाठी अत्यंत हितकर असते.

– मूग रूक्ष, हलके, थंड व मधुर असतात कफ व पित्तनाशक, किंचित वायूकारक, डोळयांसाठी हितकारक, जुलाबात गुणकारी, तसेच तापशामक आहेत.

– जंगली मुगामध्ये अशाच प्रकारचे गुणधर्म आढळतात.

Leave a Comment