तोंड येणे | Mouth Ulcer First Aid Treatment In Marathi

आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.

उपाय :

१) १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते सकाळी बारीक चावून खावे.

२) सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.

३) जखमांना ज्येष्ठमध किंवा शुद्ध गेरूची पूड लावावी.

४) अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.

५) रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.

६) साधे उकडलेले जेवण घ्यावे व जागरण टाळावे.

Leave a Comment