नैसर्गिक उपायांनी वाढवा ओठांचे सौंदर्य

 

१. चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओठांची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच ओठांना कॉसमॅटिक लिप बाम लावण्याऐवजी काही नैसर्गिक लिप बामचा वापर करा.

२. मलई : दुधाची साय ओठांना मुलायम करते. सायीमध्ये फॅट (मेद) मुबलक प्रमाणात असते. ओठांवर हळूवार साय चोळा. 5-10 मिनिटांनंतर कापसाच्या बोळ्याने साय पुसून, ओठ स्वच्छ करा.

३. खोबरेल तेल : ओठ फुटण्याची समस्या कमी करण्यासाठी,ओठांना रोज हलकेच खोबरेल तेल लावा. दिवसांतून 3-4 वेळेस तेल लावल्याने ओठांचे मॉईश्चर राहते.

४. काकडी : ओठांची शुष्कता कमी करून त्यांना टवटवीत करण्याची क्षमता काकडीमध्ये आहे. काकडीचा तुकडा ओठांवर हलक्या हाताने चोळल्यास ओठांचे सौंदर्य वाढते.

५. ऑलिव्ह ऑईल : ओठ सुकणे तसेच फुटणे अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. नियमित लिप बामऐवजी ओठांना ऑलिव्ह ऑईल लावा.

६. मध : ओठांवर मध लावून त्यांच्यावरील ओलसरपणा कायम ठेवता येतो. मध कायम रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावा. तुमचे ओठ चांगले ठेवण्याचा, सूर्य प्रकाशामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्याचा हा चांगला मार्ग आहे.

७. कोरफड : चवीला थोडे कडवट असलेले कोरफड, ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरफडीचे पान मधोमध कापून त्यातील गर ओठांना लावा.

८. तूप : तूप नेहमी घरात उपलब्ध असते. तुपाचाही मधासारखाच उपयोग होतो. रोज ओठांना तूप लावून त्यांचा ओलसरपणा वाढवा. आठवडाभरात तुमचे ओठ पूर्वीसारखेच सुंदर दिसतील.

९. लिंबाचा रस याचा वापर वाढत्या वयामुळे त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी होतो. ओठांच्या संवेदनशील त्वचेचे पोषण केल्याने ओठ मऊ आणि तजेलदार राहतात. एका भांड्यात एक चमचा दूध अथवा क्रीम घेऊन त्यात तीन थेंब लिंबाचा रस टाका आणि ते एक तास फ्रीजमध्ये ठेवा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांच्या भोवती लावा. लिंबातील ब्लिचिंगच्या गुणधर्मामुळे ओठांचा रंग उजळेल आणि ओठ ओलसर होतील.

१०. डाळींबाची साल आणि डाळींबीच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावावा, यामुळे ओठांचा रंग उजळेल. ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा, किंवा व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून ओठांवर चोळावी.

११. वातावरणातील बदल, वाढते वय आणि ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात. ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होते. यापासून सुटका होण्यासाठी फळे, भाज्या, मासे, अंडी, सुकामेवा, दूध यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *