नौकासन

1) या आसनाच्या शेवटच्या भागात आपल्या शरीराची अवस्था एखाद्या नावेप्रमाणे होते. यामुळेच या आसनाला नौकासन म्हणतात.

2) शवासनात ज्या पद्धतीने आपण जमिनीवर शांतपणे झोपतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपावे. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत असावेत. मान सरळ असावी.

3) आता दोन्ही हात, पाय आणि मानेला सावकाश आकाशाच्या दिशेने वरती उचलावे. हे आसन जलद करण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. अन्यथा मानेचा विकार उद्भवण्याची शक्यता असते. हे आसन करताना संपूर्ण शरीराचे वजन नितंबावर आधारीत असावे आणि सर्व लक्ष आकाशाकडे असावे.

4) शरीराला आकाशाच्या दिशेने उचलताना अत्यंत सावकाशपणे हे आसन करावे. यात कोणतीही घाई करू नये. पायाचे विकार असलेल्यांनी वा स्लिप डिस्कचा त्रास आहे अशांनी हे आसन करणे टाळावे

5) या आसनाने पचन क्रिया चांगली होते. छोट्या आणि मोठ्या आतड्याचे काही विकार असतील तर त्यात आराम मिळतो. रक्त शुद्ध होण्यासाठीही हे आसन महत्त्वाचे आहे.

Leave a Comment