पश्चिमोत्तनासन

1) पश्चिम म्हणजे मागचा भाग. पाठ. पाठीला ताण देणे म्हणजे पश्चिमोत्तासन. या आसनामुळे शरीराचा सर्व भाग चांगलाच ताणला जातो.

2) दोन्ही पाय समोर पसरून बसा. दोन्ही टाच व पंजा एकमेकांना जुळवा. दोन्ही हात बगलेलगत, कंबर सरळ व नजर समोर अशा स्थितीत रहा.

3) आता दोन्ही हातांना बगलेच्या वरून कानाच्या बाजूने वर न्या. या स्थितीत दोन्ही हातांमध्ये डोके असेल. आता हळू हळू कंबर खाली वाकवा. आता दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा आणि कपाळ गुडघ्याला टेकवता येते का ते पहा.

4) नंतर हळू हळू कुंभकात थांबून मग डोके वर करा आणि पूर्वस्थितीत या.

5) या आसनात कंबर हळू हळू झुकवा आणि वर घ्या. कपाळ जबरदस्तीने गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न करू नका. हे आसन सुरवातील अर्धा ते एक मिनिट करावे आणि नंतर खूप सरावानंतर पंधरा मिनिटांपर्यंत ते टिकविण्याचा प्रयत्न करा. कंबर वा पाठीचा काही त्रास असल्यास योगतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच हे आसन करा.

6) या आसनामुळे पोट, छाती व पाठीच्या कण्याला चांगला व्यायाम मिळतो. या आसनामुळे भूक न लागणे, मलावरोध, अजीर्ण, पोटाचे विकार, सर्दी, खोकला, वातविकार, कंबरदुखी, मधुमेह या रोगांवर आराम पडतो. भूक लागते. कफ व चरबी कमी होते. ढेरीही कमी होते.

Leave a Comment