पवन मुक्तासन

1) असे करावे हे आसन: आधी जमिनीवर शवासनात झोपावे. नंतर दोन्ही पाय गुढघ्या पासून आत दुमडत पोटाशी घट्ट धरावेत. गुढघा छातीपर्यंत लावण्या.चा प्रयत्न करावा, आणि पोटावर हलकासा दबाव आणण्याचा प्रयत्न करावा. आता श्वास अलगत बाहेर सोडत पुन्हा सावकाशपणे हनुवटीने गुढघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.

2) आपल्या शक्ती नुसार कालावधी निश्चित करावा. उदा: 10 सेकंदांपासून ते 30 सेकंदांपर्यंत हे आसन करावे. ( सरावाने कालावधी वाढूही शकतो.)

3) पुन्हा हलकासा श्वास सोडत पुन्हा शवासनाच्या आधीच्या स्थितीत यावे. हे आसन 3 ते 4 वेळा आपण करू शकता. हे आसन आणखी एका पद्धतीने करता येऊ शकते त्याला अर्ध पवनमुक्तासन असे म्हणतात. यात क्रिया करताना दोन्ही पायांऐवजी आधी उजवा आणि नंतर डावा असेही हे आसन आपण करू शकतो.

4) जर तुम्हाला कमरेचे, पोटाचे आणि मानेचे विकार असतील तर कृपया हे आसन करण्याचा प्रयत्न करू नये. आसन शांतचित्ताने करावे.आसन करताना कोणत्याही स्वरूपाची घाई टाळावी

5) आसनाचे फायदे: या आसनामुळे पोयाचे विकार कमी होण्यास मदत मिळते, पचनाच्या विकारात हे आसन फायदेशीर आहे. हृदय रोग असो किंवा स्त्रियांच्या पोटाचे विकार या आसनाने तुम्हाला फायदा मिळेल.

6) वजन कमी करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे, या आसनाच्या नियमित करण्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *