गरोदरपणात आहार

१) जन्माला येणारे मूल आधी आईच्या पोटात वाढत असते. मूल पुढच्या आयुष्यामध्ये निरोगी, सक्षम, कार्यक्षम रहावे यासाठी त्याच्या आईला गरोदर अवस्थेत चांगला आहार दिला पाहिजे. याच काळात या मातांना फळे आणि पोषण द्रव्य युक्त अन्न दिले पाहिजे.

२) गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.

३) प्रथिनांसाठी अंडी आणि दूग्धजन्य पदार्थ दिले पाहिजेत. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे.

४) सामन नावाचा मासा गरोदर महिलेला खायला दिल्यास त्याच्या माध्यमातून ओमेगा-३ हे फॅटी ऍसिड तिला मिळते. त्याचा उपयोग बाळाचा मेंदू आणि डोळे चांगले होण्यासाठी होतो.

५) कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी.

६) भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात पाहिजे.

७) पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.

८) गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले.

९) दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.

Leave a Comment