ब्लॅक हेडसच्या समस्या

1) सगळ्यात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहर्यावर हलक्या हाताने मसाज करा. स्क्रबचा प्रयोग केल्याने चेहर्यावरील तेलकटपणा कमी होतो.

2) घराच्या बाहेर पडताना चेहर्यावर मॉइस्चराइज़रचा उपयोग जरूर करा.

3) एक मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा, उकळत्या पाणीची वाफ चेहर्यावर घेतल्याने ब्लॅक हेड्स घालवता येऊ शकतात. ब्लॅक हेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

4) ब्लॅक हेड्स स्ट्रीप केल्याने सहज दूर होतात.

5) ब्लॅक हेड्सवर वारंवार हाताची बोटे फिरवू नये. तसे केल्याने ते चेहर्यावर पसरण्याची शक्यता असते.

6) त्वचा चांगली राहावी म्हणून टोनर, क्लीनर व मॉइश्चरायजर्स नियमित लावले पाहिजे. त्यात तेही ब्रॅंडेड पाहिजेत.

7) दिवसभरात भरपूर पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून पोट साफ रहाते.

8) तेल व मसालेयुक्त पदार्थाचे जास्त सेवन केल्याने त्याचा त्वचेवर विपरित परिणाम होतो.

9) नियमित व्यायाम व संतुलित आहार घेतल्याने चेहर्यावर तेज येते. त्वचेचा रंग खुलतो.

Leave a Comment