डोळ्यांखालची काळी वर्तुळे व त्यावर उपाय

१. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तुमच्या चेहऱ्यावर असतील तर चेहरा निस्तेज वाटतो.

२. भरपूर झोप घ्या : अपुरी झोप हे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे या उक्तीप्रमाणे लवकर झोपावे आणि भरपूर झोप घ्यावी. झोपण्याआधी चेहऱ्यावरील मेकअप पूर्णपणे काढावा, चेहरा स्वछ धुवावा. जर तुम्ही मेकअप चेहऱ्यावर घेऊन झोपत असाल तर दीर्घकाळात त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन त्वचा निस्तेज आणि रुक्ष व्हायला सुरुवात होते.

३. मद्यपान आणि धूम्रपान टाळा : मद्यपान आणि धुम्रपानामुळे अनेक तोटे होतात तसेच झोप न येणे, उशिरा झोपणे या समस्या ग्रासतात त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळल्याने चेहऱ्यावरील काळी वर्तुळे निघून जायला मदत होते.

४. बी जीवनसत्व असलेला आहार घ्या : मासे, चिकन, मटण आणि अंडी यामधून मिळणारे व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने देखील काळी वर्तुळे येतात. शाकाहारी लोक दुग्धजन्य पदार्थातून बी१२ मिळवू शकतात जसे की चीज,सोया प्रोटीन.

५. ऍलर्जी : काही वेळेस विविध ऍलर्जी मुळे देखील चेहऱ्यावर डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.अशा वेळेस त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

६. नाक चोंदलेले असणे : सतत नाक चोंदलेले असेल, सतत सर्दी असेल तर सायनसच्या शेजारील भागावर सतत ताण येऊन डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.

७. अयोग्य एकांगी आहार टाळा : आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी चौरस आहार आवश्यक आहे. सर्व प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशी सर्व पोषणतत्त्वे शरीरात जातील असा आहार निवडावा. आहारात सर्व प्रकारची फळे, धान्ये, हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या, सुका मेवा यांचा समावेश असावा.आहारात अति मीठ वापर टाळावा.

८. विश्रांती घ्या : योग्य विश्रांती घेतल्याने डोळ्यांवरचा अतिरिक्त ताण निघून जातो.आपला चेहरा आणि डोळे हे तुमच्यावर आलेला ताण लगेच दाखवतात त्यामुळे योग्य विश्रांती घ्या आवडीचे काम करा, आवडीची गाणी ऐका.

९. काकडीचे काप डोळ्यावर ठेवा : अनेक वर्षांपासून डोळ्यावर काकडी ठेवून डोळ्याभोवतालच्या भागाला आराम दिला जातो, काकडीचे २ काप काढून १०-१५ मिनिटे मिटलेल्या डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो, डोळ्यांभोवती रक्तप्रवाह सुधारतो, अतिरिक्त ताण कमी होतो, डोळ्यांना तजेलदार वाटते.

१०. बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवणे : डोळे मिटून त्याच्यावर बटाट्याचे काप ठेवल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होते.

११. बदामाचे तेल लावा : झोपण्याआधी डोळ्यांभोवती बदाम तेल लावून मसाज केल्याने व्हिटॅमिन ई चा पुरवठा होतो.

१२. मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळा : मोबाईल,लॅपटॉप, टीव्ही यांच्या स्क्रीनचा जास्त वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो त्यामुळे या सर्वांचा अतिरिक्त वापर टाळावा, रात्री झोपताना जास्त वेळ मोबाईल वापराने टाळावे.

१३. टोमॅटो आणि लिंबू यांचा रस डोळ्यांना लावून सुकल्यावर धुवून टाकावे.

Leave a Comment