मळमळण्यावर उपाय

१) जेव्हा स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंद होतो परंतु ते पहिले दिवस बरेच अवघडही असतात.

२) डाळिंबाचा रस किंवा फळाच्या सालीचा काढा साखर टाकून प्यावा.

३) कोणत्याही गोष्टीची शिसारी घालवण्यासाठी थंड पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावे आणि त्या पाण्याचा वास घ्यावा किंवा लिंबू पिळल्यानंतर राहिलेली फोड चघळावी.

४) एक लिटर उकळलेले पाणी खाली उतरवून त्यात दोन पसे साळीच्या लाह्या टाकून झाकण ठेवावे. यात मीठ-साखर घालून नंतर प्यावे.

५) फळांचे किंवा भाज्यांच्या सलाडवर आले किसून सलाड खावे किंवा हेच आले चहात घालावे.

६) मळमळणे, शिसारी येणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर अशक्तपणा जाणवणे, गरगरणे किंवा उलटी होणे अशा प्रकाराने गरोदर अवस्थेच्या पहिल्या काही दिवसात महिला त्रस्त होऊन जातात.

७) कच्चे दूध पिण्याने ही उलटी होत नाही.

८) एक वेलदोडा तव्यावर काळपट होईपर्यंत भाजून त्याची पूड करून मधातून चाटवावी. याने ताबडतोब आराम वाटतो.

९) शक्य असल्यास या बरोबर सूतशेखर एक गुंज मधातून सकाळी उठल्याबरोबर चाटण द्यावे. असे पाच-सात दिवस करावे.

१०) तरीही मळमळ-उलटया थांबत नसतील व तीन-चार महिन्यांनंतरही त्रास चालूच असेल तर डॉक्टरांकडे जावे.

Leave a Comment