डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी

1) आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी काकडीचे गोल खाप महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच डोळय़ांना आरामही मिळतो. काकडीचे खाप चांगले क्लीनझर आहे. डोळ्यांखालील काळे वर्तुळे जाण्यास ते मदत करते. काकडीची गोल खाप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

2) तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल, तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत.

3) सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्यांखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

4) टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे.

5) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.

Leave a Comment