सागरगोटा | Sagargota Nuts Benefits In Marathi

• कुंपणासाठी सागरगोट्यासारखे उत्तम झाड नाही. याला काटे असतात, फळही काटेरी असते.
• एका फळातून चार – पाच सागरगोट्याच्या बिया निघतात. बियांपासून सागरगोट्याची लागवड करता येते.
• बिया रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी कुंपणाच्या जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळून या बियांची लागवड करावी. साधारणपणे 25-30 सें.मी. अंतरावर बी टोकावी. साधारणपणे दीड – दोन वर्षांत पक्के कुंपण तयार होते.
उपयोग –
1) औषधात सागरगोट्याचे बी व पाने वापरली जातात.

2) मधुमेह, पोटदुखी, जंत, गर्भाशयाची सूज वगैरे विकारांमध्ये सागरगोट्याची बी वापरली जाते.

3) लहान मुलांच्या बाळगुटीत सागरगोटा असतो.

4) वायूने पाट फुगते, दुखते त्यावर सागरगोटा भाजून, आतला मगज काढून, त्यात समभाग काळे मीठ टाकून घेण्याचा उपयोग होतो.

5) सुजेवर सागरगोटा उगाळून लेप लावल्यास सूज कमी होते.

Leave a Comment