शवासन

1) शव म्हणजे अर्थातच मृतदेह. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन.

2) या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाच आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद हवेत.

3) पूर्ण शरीर सैल सोडून द्या. त्यानंतर संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करा. श्वास आत येणे व बाहेर जाण्याच्या प्रक्रियेवर नीट लक्ष द्या. श्वास आत येताना हळूवर थंडपणा जाणवतो, त्याचा अनुभव घ्या. त्याचवेळी श्वास बाहेर सोडताना हलका गरमपणा जाणवतो, तोही अनुभवा.

4) यानंतर अनुक्रमे छाती व नाभीवर लक्ष केंद्रीत करा. मनात शंभरापासून एकपर्यंत उलट्या क्रमाने आकडे मोजा. आकडे मोजण्यात चुक झाल्यास शंभरापासून पुन्हा सुरू करा.

5) या आसनात डोळे बंद हवेत. हात शरीरापासून सहा इंच दूर व पायात एक ते दीड फूट अंतर हवे. शरीर पूर्णपणे सैल सोडले पाहिजे. श्वास घेताना शरीर हलवू नका. आपले लक्ष पूर्णपणे शरीरावर हवे. मनातल्या विचारांवर नाही. त्यामुळे श्वास घेण्यातली सहजता अनुभवा.

6) मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे.

7) या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.

Leave a Comment