शिकेकाई | Shikakai Benefits In Marathi

1) शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात.

2) केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.

3) त्वचा कोरडी पडत नाही. रे
4) शमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.

5) खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.
6) हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.

7) कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो.

8) शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.
9) चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.

10) बिया सुलभ प्रसूतीकरिता देतात.
11) गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.

12) बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.

13) शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात [→ रिठा], कारण शेंगात सॅपोनीन हे ग्लायकोसाइड ५% असते. शिकेकाईयुक्त साबण बाजारात उपलब्ध आहेत. ‘
14) सप्तला’ ह्या नावाने सुश्रुतसंहितेत शिकेकाईचा निर्देश शाकवर्गात केलेला आढळतो.

Leave a Comment