स्वयंपाकातील औधडी रत्ने | Kitchen Home Remedies

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने:-
दालचिनी :-

कफ भरल्यासारखे वाटत असेल तर दालचिनीचे १ ते २ चिमूट चूर्ण १/२ चमचा मधाबरोबर चघळावे. दम लागणे कमी होते तसेच कफ आणि सर्दी कमी होते. असे गरजेप्रमाणे १ ते ३ दिवस करावे .

लसून :-
लसून हे खूप आजारांवर गुणकारी आहे . हृदयावर ,रक्तातील चरबीवर इत्यादी.

संधिवात असलेल्यांनी लसून आणि सुके खोबरे एकास २ या प्रमाणात एकत्र करून ठेवावे . रोज रात्री जेवणाबरोबर १ चमचा मिश्रण खावे आणि रात्री झोपताना १ चमचा एरंडेल प्यावे . हाडे बळकट होतात .

जिरे :-
नवप्रसूत स्त्रीने प्रसवानंतर लगेच १ महिनाभर तरी रोजच्या जेवणात १-१ चमच जिरेपूड खावी .
“यामुळे गर्भाशयाचे त्रास टाळता येतात .

जायफळ :-
पाण्यासारखे पातळ जुलाब होत असल्यास जायफळ चूर्ण १/२ चमचा आणि काळी कॉफी १ कप एकत्र करून प्यावे .जुलाब कमी होतात .

तरीही थकवा जाणवत असेल तर वैदयाचा सल्ला घ्यावा.

शेंगदाणे:-

१ मू ठ कच्चे शेंगदाणे +१० ग्रॅम गूळ रोज सकाळी खावा .
शरीरात कोरडेपणा वाढत नाही तसेच शरीरावर मांस वाढायला फायदा होतो.

बेसन :-
ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना तेलाच्या मालीशीची गरज असते बेसन लावून त्वचा अजून कोरडी होते , म्हणून साबण वापरण्यापेक्षा तीळ तेलाने किंवा शेंगदाणा तेलाने मालिश करून बेसन वापरल्यास असा त्रास होत नाही .

कढीपत्ता :-

कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पेस्ट तयार करावी व ती खोबरे तेलात टाकावी .हे तेल वापरावे असे केल्याने केस पांढरे होत नाही .

डायबेटीसच्या रुग्णांनी कढीपत्त्याची १०-१२ कच्ची पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते .

नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाही .
कढीपत्ता पचनास मदत करतो .

लवंग :-
कॉलरा रोगामध्ये नियमित एक लिटर पाण्यात चार लवंगा उकळवून ते पाणी प्यावे .
सर्दी -खोकाल्यामध्ये लवंगा गरम करून अधूनमधून चघळल्यास उपयुक्त ठरते .
दात दुखत असल्यास लवंग दाताखाली दाबून धरावे अथवा लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून तेथे ठेवावा .
गरोदरपणात ओकाऱ्यावर एक लिटर पाण्यात ४/६ लवंगा उकळून थोडी खडीसाखर टाकून ते पाणी प्यायला द्यावे .

हिंग :-

हिंगाचा वापर स्वयंपाकात पदार्थाचा सुंगध व स्वाद वाढवण्यासाठी केला जातो .
पोट दुखत असेल किंवा जुलाब होत असतील तर हिंग खाल्यास फायदा होतो .

हिंग हा उष्ण गुणांचा असून कृमिनाशक आहे .तो खाल्ल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते . तसेच मेंदू व लिव्हरला शक्ती मिळते

मध :-
१. पित्ताशयाच्या सर्व विकारांवर मधाचे नियमित सेवन करणे लाभदायक ठरते .
२. मार लागल्यास त्या जागी गरम मध लावल्यास लवकर आराम पडतो
३. पोटदुखी ,थंडी ,खोकला टाळण्यासाठी चमचाभर मधात ४ काडया केशर टाकून चाटावे .
४. सकाळी रिकाम्या पोटी थंड पाण्यासोबत मध घेतल्यास रक्तशुद्धी होऊन त्वचा निरोगी व चमकदार होते .
५. उत्तम दृष्टीसाठी कडुलिंबाचा मध सुरम्याप्रमाणे डोळ्यांत घालू शकता .
६. मूरमांवर मध व लिंबूचा लेप करावा .
७. परिश्रमानंतर चमचाभर मध १/२ कप पाण्यात मिसळून घेतल्यास थकवा दूर होतो .

वेलदोडे :-
१. इलायचीच्या सेवनाने पोटातील गॅस, सूज यासारखे त्रास कमी होतात .
२. नियमित इलायचीचे सेवन केल्यास खोकला,अस्थमा,ताप असे आजार ठीक होतात .
३. तोंडाची दुर्गंधी दूर होते .
४. हृदयाची गती नियंत्रित राहते .
५. इलायचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.

Leave a Comment