प्राणायामचे प्रकार- 2) सीत्कारी

1) या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक होतो. तहान लागली असताना हा प्राणायाम केल्यास तहान भागल्याचं समाधान मिळतं.

2) प्रथम पद्मासनात किंवा मांडी घालून बसावं. आता दात एकमेकांवर दाबून ठेवा, जीभ दातांना लावा. जिभेचं टोक टाळ्याला लावा. ओठ किंचित विलग ठेवा आणि ‘सी.. सी..सी’ असा आवाज करून तोंडाने पूरक करा म्हणजेच श्वास आत घ्या. श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा व शक्य होईल तितका वेळ कुंभक करा व त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.

3) या प्राणायामच्या सरावाने भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात. डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत, प्लीहा कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.

Leave a Comment