सर्पदंश | Snake Bite First Aid Treatment In Marathi

सापांच्या जवळपास 2000 जाती आहेत. त्यापैकी शेकडा 20 साप हे विषारी असतात. नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्रसर्प हया सापांच्या जास्त विषारी जाती आहेत. सगळयाच सर्पदंशात प्राणहानी होत नाही परंतु भीतीमुळे मज्जाघात होतो व काळजी न घेतल्यास माणूस दगावतो.

प्रथमोपचार :

– साप चावलेल्या ठिकाणची जखम स्वच्छ पाण्याने धुवावी.

– सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर दयावा व त्यासोबत जास्त बोलणे टाळावे.

– दंशाच्या वर हृदयाकडील बाजूस दोरीने बांधून आवळून घ्यावे. आवळपट्टी बांधतांना अवयव व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट बांधावे व बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.

– दर 15 ते 20 मिनिटानंतर आवळपट्टी अर्ध्या मिनिटांसाठी सैल करावी व पुन्हा त्याच पध्दतीने बांधावी.

– दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप देऊ नये कारण त्यामुळे जास्तीचा रक्तस्त्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

– दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.

First Aid Kit Information In Marathi

Leave a Comment