उन्हाळ्यात केसांची निगा | Summer hair care tips in Marathi

उन्हाळ्यात केसांची निगा | Summer hair care tips in Marathi

1) उन्हाळ्यात उन वाढतं तसं त्याचा परिणाम शरीरावरही पडतो. विशेषतः केसांची तर उन्हाळ्यात फार काळजी घेतली पाहिजे. कारण धूळ, माती व घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील त्वचा रुक्ष होते. पण खाली दिलेल्या काही टिप्सचा वापर केलात तर या काळातही तुम्ही केसांची निगा राखू शकता.

2) केसांना धूळ-माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी घराबाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.

3) आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा केस धुणे गरजेचे आहे. तुमचे केस तेलकट असतील तर प्रत्येक दुसर्याड दिवशी केस धुतले तरी चालतील.

4) केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून 20 मिनिटापर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुऊन टाकावे. कोंडा काढण्याचा हा सर्वांत उत्तम उपाय आहे.

5) केसांना आवळा लावल्यानेसुद्धा केस चांगले रहातात.

6) केसांवर सारखे कंगवा फिरवायला हवा. त्यामुळे केसांमधील धूळ, माती निघून जाईल.

7) केसांना हर्बल ऑइलने मसाज केल्यास उत्तम.

8) शॅंपूंचा जास्त वापर केल्यास केस कोरडे होतात. म्हणून चांगल्या कंपनीच्या शँपूचा वापर करावा.

9) मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो.

10) केसांना जास्त गरम किंवा थंड पाण्याने धुऊ नये.

11) केसांना धुतल्यानंतर कंडिशनर लावावा.

12) केसांची पोनी किंवा फ्रेंच नॉट केल्याने केस व्यवस्थित राहतात. घामामुळे खराबही होत नाही.

Leave a Comment