भूक वाढवण्याचे उपाय व भूक न लागण्याचे कारण(Loss of Appetite Treatment)

भूक वाढवण्याचे उपाय:- आजकालच्या जीवनात प्रत्येकजण तणावग्रस्त जीवन जगत आहे, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला उर्जा मिळणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे, आपल्याला भूक लागत नसेल किवा आपण योग्य पद्धतीने वेळेवर जेवत नसाल तर ही गंभीर समस्या आहे. कारण शरीराला योग्य पोषक तत्वे आहारातून मिळतात, योग्य वेळेवर आहार न घेणे किंवा कमी आहार घेणे यामुळे वजन घटणे  किंवा शारीरिक कमजोरी अशक्तपणा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

लोक जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करतात , पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे लोक आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. मित्रांनो भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

अजून आणखी काही करणे आहेत ज्याच्या मुळे  आपल्याला योग्य तो आहार घेता येत नाही बदलेल्या जीवनशैली मुळे  मुलामध्ये भुकेचे प्रमाण कमी झाले आहे आई वडलांची डॉक्टर कडे ही तक्रार असते कि आमचा मुलगा/मुलगी इतर मुलांपेक्षा कमी जेवतो, योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

आपल्यला भूक न लागण्याची समस्या आपण घरगुती पद्धतीने सोडूवू शकतो, सफरचंदा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात त्याच बरोबर आपली भूक देखील वाढण्यास मदत करतात.  सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खा किंवा सफरचंदाचा जूस प्या यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होते व आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते.

भूक वाढवण्यासाठी खालील साधे उपाय करा 

खजुराची चटणी बनवा त्यात लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी ही चटणी खा, असे केल्याने आपल्याला भूक लागेल

वेलची ही थंड असते वेलची आपल्या शरीरात गारवा निर्माण करते, वेलची चे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर प्या. हे पाणी औषधा सारखे काम करते ज्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये भाज्यांचे महत्व सांगितलेले आहेत. एक वाटी टोम्याटोचा रस घ्या त्यात एक चमचा आल्याचा रस व गाजराचा रस मिळवा. हे मिश्रण प्यायल्याने  आपली भूक वाढेल.

एक चमचा ओवा व चिमुटभर काळा मीठ वाटीभर पाण्यामध्ये मिसळून ते मिश्रण उकळून घ्या थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या व हे मिश्रण प्या काही दिवस हे मिश्रण दिवसातून एकदा प्या असे केल्याने आपली भूक वाढेल.

एक चमचा मधामध्ये थोडी काळी मिरी मिक्स करून दिवसातून २ – ३ वेळा हे मिश्रण चाटत जा यामुळे देखील आपली भूक वाढेल.

लिंबू कापून घेऊन त्यावर काळ मीठ लाऊन ते खाल्यामुळे यामुळे आपली भूक न लागण्याची समस्या दूर होईल.

आणखी काही भूक वाढवण्याचे सोपे उपाय आहेत जसे एक ग्लास पाणी उकळून त्यात चिंच मिळवा चिंच मऊ झाल्यावर चिंच त्याच पाण्यात मिसळून घ्या व उरलेली चिंच काढा या चटणीत चिमुटभर मीठ, चीमुठ्भर काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या आणि हया मिश्रणात पुन्हा पाणी मिसळून घ्या या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर भूक लागेल हा एक आयुर्वेदिक उपाय आहे.

पुदिन्याची चटणी व मधाचे मिश्रण आपली भूक वाढवते तसेच आपले पोट निरोगी ठेवते .पुदिना आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण करतो व आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो, आणि पोटा संबंधी समस्या दूर करतो, पुदिन्याची चटणी एक वाटी मधात मिळउन खाल्याने अपली भूक कमी लागण्याची समस्या दूर होईल

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!