लसूण व मधाचे फायदे | Benefits of Garlic and Honey in Marathi

लसूण व मधाचे फायदे | Benefits of Garlic and Honey in Marathi

मध आणि लसूण  एकत्र करून खाल्ल्याने अनेक फायदे होतात. रिकाम्या पोटी लसून खाल्याने देखील भरपूर फायदे होतात, लसणावर केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे कि लसून हे  Antibiotics  तसेच Anti-Septic औषध म्हणून वापरले जाऊ शकतो. याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या अनेक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. लसूण  खाल्याने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते, लसूण आणि मध खाल्याचे भरपूर फायदे आहेत ते जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल.

लसणावर केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले आहे कि यामध्ये अनेक रोग प्रतिकारक शक्ती आहेत, लसूण  जेवणामध्ये टाकल्याने जेवणाचा स्वाद वाढतो. त्यामुळे याला मसाल्यांचा राजा म्हणतात, प्राचीन काळापासून लसून हे एक प्रभावी व गुणकारी औषध मानले जाते. लसूण जेवणाचा स्वाद वाढवतो त्याच बरोबर शरीराला लाभ दायक आहे, याच्या मुळे आपण हृदयविकार या सारख्या गंभीर आजारांवर आळा घालू शकतो. हृदयविकाराचा झटका याचे मुख्य कारण रक्तदाब हे आहे. या आजारावर योग्य ते उपचार न केल्याने मृत्यू हि ओढू शकतो. आयुर्वेद व डॉक्टरांच्या नुसार लसूण  हे उच्च रक्तदाबावर  नियंत्रण ठेवण्यास मदत करते तसेच शरीरात (Detox) निर्विशीकरण करण्यास मदत करतो यामुळे शरीरातील थकावट दूर होते आणि पोटा संबंधी समस्या दूर करतात.

लसून मध्ये असलेले Anti-oxidant आपल्या शरीराला Oxidative Damage पासून वाचवते, तसेच लसूण  शरीरातून  हानिकारक रासायनिक बाहेर काढण्यास मदत करते. मधुमेह, अवसाद (Depression) आणि कर्करोग (cancer) सारखे आजार रोखण्यास मदत करते, लसून हे खूप पौष्टिक असते याच्यात खूप कमी कॅलरीज असतात. लसूण  हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे.

सकाळी रिकाम्या पोटी लसून व मध खाल्याचे फायदे

३० ते ३५ ग्राम लसणा मध्ये २३% मॅगनीज तसेच १७% vitamin B 6 असतो. Vitamin E तसेच कॅल्शियम, आयन, पोटॅशियम या सारखे महत्वपूर्ण तत्व असतात, लसूण आणि मध याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत, जे आपल्याला स्वस्थ बनवतात तसेच यांच्यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली असल्या मुळे रोगांपासून बचाव होतो.

लसूण  आणि मधाचे फायदे अनेक आहेत हे आपल्या शरीराला सर्दी व ताप खोकल्या पासून बचाव करतात, तसेच पोटाचे आजार बद्धकोष्ठता – अतिसार यासारख्या रोगांशी लढण्यास मदत करतात तसेच आपली पाचन क्रिया मजबूत व स्वस्थ बनवतात. तसेच शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका सारख्या गंभीर आजारान पासून दूर राहण्यास मदत मिळते. लसून आणि मध एकत्र करून खाल्याने आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढण्यास मदत होते, लसून आणि मध यांचे मिश्रण खाल्याने आपल्याला (Fungal Infection) बुरशीजन्य संसर्ग पासून वाचवते. घश्यात होणारी खव खव दूर होते, घश्यात होणारी सूज तसेच संक्रमण दूर करते. एवढेच नाही लसूण  आणि मध खाल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते, जर आपल्याला डायरिया सारखी समस्या असेल तर लसणाची पेस्ट करून त्यात मध मिक्स करून रोज एक चमचा हे मिश्रण खाल्याने हि समस्या दूर होते त्याच बरोबर आपली पचन क्रिया मजबूत होते.

लसून चाऊन थोडावेळ दातात धरल्यामुळे दाताचे दुखणे बंद होते. काही लसणाच्या पाकळ्या घ्या त्यात ५० ते ७० मिलीग्राम पाणी घेऊन ते वाटून घ्या त्यात १० ते १५ ग्राम मध मिसळून सकाळी सकाळी याचे सेवन करा हे आपल्या शरीराला फायदेमंद आहे तसेच आपल्या केसांची मजबुती देखील वाढवतात,

लसून खाल्याने आपली योन शक्ती वाढते, कारण लसणा मध्ये Vitamin- E, Vitamin  B6 आणि मिनरल्स असतात ज्यामुळे प्रजनंन शक्ती वाढण्यास मदत होते, लसून आणि मध मिक्स करून खाल्याने आपला सेक्स शक्ती वाढेल. लसूण आणि मध यामध्ये दालचिनी मिसळून खाल्याने गाठिया रोग, खोकला, दात दुखणे, केसांचे गळणे, पोटाचे आजार आणि शरीरात वाढलेल्या चरबी चे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!