कानाने कमी ऐकू येण्यावर उपचार | Natural Remedy For Better Hearing

कानाने कमी ऐकू येण्यावर उपचार | Natural Remedy For Better Hearing

आजकाल मोठ्याप्रमाणात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाममुळे बहिरेपणा हि समस्या सामान्य बाब झाली आहे, पण याच्या कडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कार, बसेस, ट्रेन यांचे मोठ्याने वाजणारे कर्कश हॉर्न मोठ मोठ्या कंपन्यांचे सायरन यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. सततच्या या त्रासामुळे बहीरेपणा येऊ शकतो, यामुळे फक्त बहिरेपणा नाही तर शारीरिक व मानसिक त्रास होतो. जेंव्हा समोरची व्यक्ती बोलते तेंव्हा तो बोलत असताना काही विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतात त्यामुळे हवेत कंपन उत्पन होतात, ज्यामुळे आपल्याला ऐकू येते, पण कमी ऐकू येत असल्यामुळे ही कंपन ऐकू शकत नाही, बहिरेपणा केवळ एका कानाने नाही तर दोन्ही कानाने होऊ शकतो. बहिरेपणा वर भरपूर उपचार उपलब्ध आहेत.

 

कानाने कमी ऐकू येण्याची कारणे

बहिरेपणा ची अनेक कारणे असू शकतात, बहिरेपणा हे नैसर्गीक हि असू शकते तर काहीना बहिरेपणा जन्मजात हि असू शकतो तसेच जसजसे आपले वय वाढत जाते हि समस्या उद्भवते खास करून वृद्धामध्ये हि समस्या जास्त करून आढळते. कामाच्या ठिकाणी होणारे मोठे आवाज, कानामध्ये होणारे संक्रमण, कानाच्या हाडाची कमी वाढ किंवा जास्त प्रमाणात वाढ, मोबाईल चा सतत वापर, हेडफोन चा वापर, मोठ मोठे साऊंड सिस्टीम मधून निर्माण होणारा आवाज, इत्यादी बहिरेपनाची कारणे असू शकतात.

 

कानाने कमी ऐकू येण्याची लक्षणे

कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणा यांची लक्षणे आपल्याला काही कालावधी नंतर समजतात, यामुळे याच्यावर वेळेवर उपचार होत नाहीत. पण जेंव्हा पण आपल्याला बहिरेपानाची लक्षणे लक्षात येतील तेंव्हा याच्या कडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडे जाऊन याच्यावर त्वरित उपचार करावेत, बहिरेपणाची लक्षणे: कानामध्ये शिट्टी सारखा आवाज येणे, कमी ऐकू येणे किंवा फक्त मोठ्याने ऐकू येणे, फोन वर बोलताना कानात दुखणे, इत्यादी बहिरेपणाची कारणे आहेत ती आपण सहजरीत्या ओळखू शकतो.

 

बहिरेपणावर उपचार

 

बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, योग्य त्या डॉक्टरी सल्याने बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, तसेच याच्यावर काही घरगुती उपाय देखील आहेत, तुळस व राई चे तेल तसेच राई चे तेल व धने, कांदा यांचा वापर करून आपण बहिरेपनावर उपचार करू शकतो.

तुळस व राई चे तेल : – राईच्या तेलात तुळशीची पाने टाकून गरम करून घ्या मग थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका.

 

राईचे तेल व धने : – राई च्या तेलात धन्याचे दाने गरम करून घ्या, शिजल्यानंतर थंड झाल्यावर हे गाळून घ्या व एक एक थेंब कानात टाका.

कानात पांढरया कांद्याचा रस हि गुणकारी असतो. दुधात चिमुटभर हिंग टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचे २ – ३ थेंब कानात टाका. लसणाच्या ७ – ८ पाकळ्या राई च्या तेलात गरम करा जो पर्यंत त्या पाकळ्या करपत नाही, नंतर तो तेल गाळून घ्या व थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका, एक चमचा बेलाच्या पानाचा रस व डालिंबाच्या पानाचा रस हे दोन्ही रस १०० ग्राम राई च्या तेलात उकळवा थंड झाल्यावर नियमितपणे हा रस कानात टाकल्याने आपल्याला याचे फायदे होतील. कानात डालचीनी चा तेल देखील बहिरेपणावर उपयोगी आहे.

 

कधी कधी बहिरेपणा बरा होत नाही मग त्याच्यावर एकच इलाज म्हणजे कानाच्या मशीन चा वापर करणे या मशीन मुळे ऐकू येण्यास मदत होते, यामुळे अजून बहिरेपणा वाढत नाही, काही डॉक्टरांचं अस म्हणन आहे कि आपल वय ३० – ४५ च्या मध्ये असेल आणि आपल्याला चांगले ऐकू येतय तरीही २ वर्षातून एकदा कानांचे चेकअप करावे. बहिरेपणा न होण्यासाठी काही सावधगिरी बाळगाव्यात कानात हेडफोन लाऊन आवाज मोठा करून ऐकू नये, टीव्ही चा आवाज कमी ठेवा, अंघोळ करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी, नद्या, तलाव, समुद्र, धबधब्यात अंघोळ करताना कानात कापूस घालावा यामुळे कानात पाणी जाणार नाही, कामाच्या ठिकाणी मोठ्याने आवाज होत असतील, जास्त प्रमाणात धूळ उडत असेल तर ear protection devices चा वापर करावा, कान साफ करता वेळी कानात काडी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तुने साफ करू नका.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!