तोंडात होणारे फोड (छाले) यांच्यावर घरगुती उपाय -( Mouth Ulcer home remedies )

तोंडात होणारे फोड (छाले): – तोंडात होणारे फोड (छाले) हि एक सामान्य समस्या मानली जाते. असे फोड कोणालाही, कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतात. हे फोड (छाले) सफेद रंगाचे असतात आणि त्याच्या भोवती लाल रंगाची सूज आलेली असते यामुळे खूप वेदना होतात. यांच्यावर घरगुती उपाय देखील आहेत, तोंडातील फोड हे आकाराने छोटे आणि मोठे असतात आपल्याला यामुळे खूप त्रास होतो अशा फोडांमुळे निट खाताही येत नाही आणि नीट पाणी हि पिता येत नाही, बोलण्यास हि त्रास होतो. साधारणतः अशे फोड शरीरातील पोष्टीकतेच्या कमी मुळे  होतात.

आपल्याला माहित नसेल तोंडातील फोड (छाले) आपली बदलेली जीवन शैली किंवा आपल्या खाण्या पिण्याची बिगडलेली सवयी यामुळे होऊ शकतात. अजून देखील कारण आहेत जसे बदलेले खान पान, पोटात दुखणे, बद्धकोष्टता , पोटातील ग्यास, हार्मोन्स मध्ये बदल, तोंडात काही कारणाने जखम होणे, शरीरात पोषक तत्वांची कमी जसे विट्यामीन B कॉम्प्लेक्स तसेच विट्यामीन C यांच्या कमी मुळे  होऊ शकतात.

अशा समस्ये मध्ये याच्यावर डॉक्टरी उपचार म्हणजे मल्टीविटामिन च्या गोळ्या घेऊ शकता, यामुळे हे फोड हळू हळू कमी होतील. याच्यावर घरगुती उपाय हि करू शकता. हि समस्या जास्त गंभीर नसते. असे फोड १०-१२ दिवसात आपल्या आप जातात परंतु मोठे फोड लगेच बरे होत नाहीत आणि यामुळे खूप वेदना होतात. असे फोड एकाच ठिकाणी झाले असतील तर यांना herpetologist असे म्हणतात. हे वेदनादायक असतात आणि हे देखील ठीक होतात.

घरगुती उपचार याच्यावर सोपे असतात. याच्या साठी आपल्याला जास्त काही करायची गरज नाही असे फोड घालवण्यासाठी जेष्ठमध (मुलेठी) च्या मुळांचा वापर करा यामुळे आपल्या वेदना कमी होतात आपल्याला आराम मिळतो. हे फोड वर एक सुरक्षा कवच बनवतात ज्यामुळे फोडांची आग कमी होते आणि घाव लवकर भरतात. जेष्ठमध (मुलेठी) यामध्ये एन्टी इंफ्ल्मेटोरी आणि एन्टी मायक्रोबिल गुण असतात यामुळे फोड बरे होण्यास मदत मिळते. याचा उपचार करण्यासाठी एक चमचा जेष्ठमध (मुलेठी) च्या मुळांची पावडर दोन कप पाण्यात मिळउन ३ – ४ तासांसाठी तसेच ठेवा आणि या पाण्याने गुरळी करा आपल्याला आराम मिळेल.

नारळाचा दुध असे फोड ठीक करण्यासाठी खूप फायदेमंद असते यामुळे वेदना कमी होतात, एक चमचा नारळाच्या दुधात मध मिळउन याचा उपयोग फोडांवर करा. असे दिसातून ३ – ४ वेळा करा. तसेच नारळाचे दुध १० – १५ मिनिटांसाठी तोंडात ठेवा आपल्याला फायदा होईल. धने अनेक आजारांवर गुणकारी आहे, यामुळे आपले पोटा संबंधी आजार ठीक होतात आणि तोंडातील फोड हे पोटातील गडबडी मुळे  होतात यामुळे धन्याच्या बिया च्या वापरामुळे काही प्रमाणात ठीक होतात, कारण धन्याच्या बिया तोंडातील फोडासाठी आयुर्वेदिक औषध आहे. एक चमचा धन्याच्या बिया एक कप पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर या बियांचा वापर फोडांवर आपण दिवसातून कमीत कमी दोन वेळा करा आपल्याला लवकर फायदा होईल. एलोवेरा (कोरफड ) जेल किंवा रस च्या वापरण्याने तोंडातील फोडांच्या वेदना कमी होतात, जखम लवकर भरते, हे एक प्राकृतिक औषध आहे, याच्यात एन्टी ब्याक्टेरिया, एन्टी फंगल आणि एन्टी वायरल तत्व उपलब्ध असतात. एका संशोधनात असे समोर आले आहे कि एलोवेरा जेल हि तोंडातील फोड, हिरड्यांची सूज, तोंडाची दुर्गंधी  कमी करण्यासाठी खूप फायदेमंद आहे.

मधामुळे घाव लवकर भरतात. मधामध्ये एन्टी ऑक्सिडंट व मायक्रोबिल गुण असतात जे जखम लवकर भरण्यास मदत करतात. कापसाला मध लाऊन ते फोडांवर लावा आपल्याला आराम मिळेल, तसेच ग्लिसरीन व विट्यामीन E तेलाचा वापर अशा पद्धतीने करू शकता. रात्री झोपताना गाईच्या दुधाचे तूप तोंडातील फोडवर लावा आपल्याला आराम मिळेल. रोज सकाळी पेरूची कोवळी पाने चघळा, लिंबाच्या रसात मध टाकून गुरळी करा आपल्याला आराम मिळेल. खायची पाने सुकउन त्याचा चूर्ण बनवा आणि त्यात मध टाकून तोंडातील फोडांवर लावा, जास्त पाणी प्या त्यामुळे आपले पोट साफ होईल. साध्या पद्धतीचे जेवण करावे जास्त तिखट व तेलकट खाऊ नये. हे काही उपचार आहेत यांचा उपयोग करावा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!