सारखे सारखे लघवीला होणे व त्याची कारणे-( Frequent Urination: Causes and Treatments)

सारखे सारखे लघवीला होणे याचे अनेक करणे असू शकतात, तसं पाहता मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक व अत्यावश्यक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिलि एवढे मूत्र तयार होत असते.

पण काही विकारात मात्र दिवसासुद्धा अनेकवेळा लघवी होत राहते. काहींना प्रत्येक वेळेस भरपूर होते तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते. असे विविध त्रास अनेक आजारात होतात. दिवसातून ७-८ वेळेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे म्हणजे बहुमूत्रता होय.

वारंवार लघवीला कां जावे लागते?

काही आजारांनी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला जास्त प्रमाणात लघवी बाहेर पडते. त्यामुळे दिवसभरा २.५ लीटरपेक्षा जास्त लघवी होऊ शकते. याची कारणे

जीवनशैली व सवयी – जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास साहजिकच मूत्र-विसर्जनसुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात होणारच. याशिवाय चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्‍या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते. सतत खूप थंड हवामानात राहणार्‍यांना, सतत एसीमध्ये काम करणार्‍यांना देखील हा त्रास होतो.

मधुमेही रुग्ण – मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे     मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे  व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. जेव्हा मधुमेही रुग्णाची रक्तातली साखर वाढलेली असते, तेव्हाही त्याची मूत्रप्रवृत्ती वाढलेली आढळते.

मूत्रमार्गाचे इन्फेक्शन – मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला तर वरचेवर लघवी होऊ लाते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.

काही औषधे डाययुरेटिक गटातील औषधे, उच्च रक्तदाबावरील काही औषधे, काही निद्रानाशके यांच्या परिणामांनी लघवीचे प्रमाण वाढू लागते.

गर्भावस्था गरोदर अवस्थेतील साधारण तिसर्‍या महिन्यानंतर आकारमानाने वाढत जाणार्‍या गर्भाशयाचा दबाव मूत्राशयावर येऊन सारखी थोडी-थोडी लघवी होते.

प्रोस्टेट – प्रोस्टेट नावाच्या ग्रंथी पुरुषांच्या मूत्राशयाच्या बाह्यभागास लागून बाह्यमूत्रमार्गाच्या सुरुवातीला असतात. वयाच्या पन्नाशीनंतर त्याचे आकारमान वाढू शकते. अशा वेळेस मूत्र बाहेर पडण्यास अडथळा होऊ लागतो आणि लघवीला थोडी थोडी पण सतत होते.

इतर आजार – ओव्हरऍक्टिव्ह ब्लॅडर, पाठीच्या मणक्यांचा आजार, मूत्राशयाचा कर्करोग, कर्करोगासाठी रेडिओथेरपी घेतल्यावर अशा प्रकारचे त्रास होतात.

वारंवार लघवी होणे, या लक्षणाचा उपचार करताना तो ज्यामुळे होतोय त्या आजाराप्रमाणे करावा.

आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत. चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी प. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा.मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा.औषधांमुळे होत असेल तर डॉक्टरांकडून औषधे बदलून घ्यावी. * प्रोस्टेटसारख्या काही आजारांत विशेष औषधे किंवा शस्त्रक्रियात कामी येते.

त्याचप्रमाणे लहान मुलांच्या या समस्येला गंभीरतेने घेतले पाहिजे. जर मूल वारंवार लघवीला जात असल्यास  त्याच्या पालकांना याबद्दल कळवावे, कधीकधी समुपदेशनाने, योग्य कारण निवारण झाल्यास ही समस्या सुटू शकते.

काही आजारात मूत्राशयांवर ताबा रहावा यासाठी काही व्यायामसुद्धा केले जातात. ओटीपोटाच्या स्नायूंचे व्यायाम देखील देखरेखीखाली केल्यास ओव्हर ऍक्टिव्ह मूत्राशयात लाभ होतो.होतो

औषधी द्रव्यांचा विचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित रोगाचे निदान करून त्या त्या कारणांची चिकित्सा घ्यावी. त्याचप्रमाणे गोक्षुरादि गुग्गुळ, चंद्रप्रभावटी, वरुणादि काढा, पुनर्नवासवसारख्या मूत्रसंस्थांवर काम करणार्‍या औषधांचा वापर करावा. तसेच ओवा १ चमचा, २ चमचे तीळ एकत्र करून खाण्यास द्यावे. त्रिफळा चूर्ण व लोहभस्म मधातून देता येते. जांभळीचा अवलेह किंवा बियांचे चूर्ण साखरेतून द्यावे.

वारंवार लघवीला जाणे ही जरी विशेष त्रासदायक नसली तरी आपल्या डॉक्टरांशी त्याची चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे हेच महत्त्वाचे असते.